मुंबई : आजपासून आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना रंगणार आहे. दरम्यान कोलकाताच्या टीमने ऑक्शनमध्ये मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेला आपल्या ताफ्यात घेतलं. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याचा समावेश होणार का हा प्रश्न आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र अजिंक्य रहाणेले ओपनर म्हणून उतरवल्यास टीमचा फायदा होऊ शकतो. विराट कोहलीचे माजी कोच राजकुमार शर्मा यांनी सांगितलं की, अजिंक्य रहाणे पॉवर प्लेमध्ये चांगला खेळ करू शकतो. तो एक चांगला फलंदाजही आहे.


यूट्यूब पॉडकास्ट खेलनीतीमध्ये बोलताना राजकुमार शर्मा म्हणाले, अजिंक्य रहाणे अजूनही छोट्या फॉर्मेटच्या क्रिकेटमध्ये चांगला खेळ करू शकतो. तो एक उत्तम फलंदाज असून त्याचा एक टेस्ट क्रिकेटचा लेबल लावण्यात आला आहे. 


सुरुवातीला त्याने राजस्थान रॉयल्ससाठी चांगला खेळ केला होता. तसचं मुंबईसाठी तो रणजी ट्रॉफीमध्ये ओपनर म्हणून चांगली खेळी करतो. केकेआर त्याला पॉवर प्लेमध्ये फायदा उचलण्यासाठी मैदानात उतरवू शकते. रहाणे असं करण्यास नक्कीच सक्षम आहे, असंही शर्मा म्हणालेत.