मुंबई: टीम इंडियाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांना स्लेजिंगचे वेगवेगळे अनुभव मिळत असतात. ऑस्ट्रेलियाची टीम तर सर्वात जास्त स्लेजिंग करण्यात माहीर समजली जाते. जेव्हा सामना आपल्या हातातून सुटतो याची भीती त्यांना वाटते तेव्हा तीन चार खेळाडू मिळून स्लेज करतात. याचे काही किस्से देखील आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा स्टार फलंदाज गब्बर आणि हिटमॅननं एक जबरदस्त किस्सा सांगितला आहे. ऑस्ट्रेलिया सामन्या दरम्यान टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य राहणेनं ऑस्ट्रेलिया बॉलर्सना दिलेला दणका तर जबरदस्त होता. स्लेजिंगदरम्यानचा एक भन्नाट किस्सा शिखर धवननं आपल्या मुलाखतीत शेअर केला आहे. 


'अजिंक्य रहाणे बॅटिंग करण्यासाठी क्रीझवर आला. त्याला ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मिळून स्लेजिंग करत होते. रहाणेने सुरुवातीला दुर्लक्ष केलं पण ऐकत नाहीत म्हटल्यावर अजिंक्य रहाणेनं बॉलरला असे हावभाव तोंडाने करून दाखवले की दोन मिनिटं तोच चक्रवाला.' 


रोहित शर्माने देखील इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की, 'अजिंक्य रहाणे खूप शांत आहे. मात्र त्याला ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अपशब्द बोलून डिवचत होते. त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केलं मात्र ऐकत नाहीत म्हटल्यावर त्यांना प्रत्युत्तर म्हणून रहाणेने बॉलरजवळ जाऊन जीभ बाहेर काढत चेहऱ्याने विचित्र हावभाव केले. '


'अजिंक्य रहाणेनं जे केलं त्याने बॉलर एवढा चक्रावला की बस रे बस सर्वांना हसू फुटलं. तर दुसऱ्यावेळी अजिंक्य रहाणे काहीतरी सांगत असता ऑस्ट्रेलियाच्या टीममधील खेळाडूने पार्डन पार्डन असं म्हटलं त्यावर चिडून अजिंक्य रहाणेनं गो टू द गार्डन असं उत्तर दिलं होतं.' 


क्रिकेटमध्ये जेव्हा सामना हातून निसटणार असतो तेव्हा तो आपल्या बाजूनं वळवून घेण्यासाठी फलंदाजांचं लक्ष विचलित करण्यासाठी स्लेजिंग करतात. त्यामुळे फलंदाज चिडतो आणि विकेट्स जातात किंवा त्याच्या हातून चूक होते त्यामुऴे तो आऊट होतो. असे काही प्रसंग वेगवेगळ्या सामन्यादरम्यान घडत असतात.