मुंबई : काल संध्याकाळी संपूर्ण जल्लोषात आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात झाली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात केकेआरने चेन्नईचा पराभव केला. या सामन्याचा शिल्पकार ठरलाय. या सामन्यात अजिंक्य रहाणेने 44 रन्सची झुंजार खेळी केली. त्याच्या या खेळीपुढे महेंद्रसिंग धोनीचं अर्धशतकंही फिकं ठरलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या सिझनमध्ये अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यात सामील झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात 132 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेनं युवा ओपनर व्यंकटेश अय्यरसोबत डावाला सुरुवात केली.  


ओपनर म्हणून उतरलेल्या अजिंक्य रहाणेने दिमाखदार खेळ करत आपल्यातील धमक दाखवून दिली. रहाणेचं अर्धशतक जरी हुकलं असलं तरी त्याने टीमसाठी उत्तम खेळी केली. त्याने 34 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 44 रन्स केल्या. रहाणेने मारलेला तो सिक्स बघण्याजोगा होता.


व्हिडीयो पाहण्यासाठी इथे क्लिक करा


टीम इंडियामधील सततच्या खराब कामगिरीमुळे अजिंक्य रहाणेला टीममधून डच्चू देण्यात आलाय. त्यानंतर बीसीसीआय करारातील श्रेणीतही त्याची घसरण झाली. मात्र त्यानंतर अजिंक्य रहाणे रणजीमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याचा चांगला प्रयत्न केला. तर आता आयपीएलमध्येही तो उत्तम खेळ करतोय.