मुंबई : भारतीय कसोटी संघाचा उपकॅप्टन अजिंक्य रहाणेने कौतुकास्पद पाऊल उचलल आहे. शेतकऱ्यांसाठी अजिंक्य रहाणेने 'मेरा किसान' या स्टार्टअप कंपनीत गुंतवणूक केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी अजिंक्यने केलेल्या या कामाचं खूप कौतुक होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशात शिकून मायदेशी परतलेल्या प्रशांत पाटील या तरूणाने नैसर्गिक शेतीमालाच्या विकासाकरता 'मेरा किसान' नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीची कामाची पद्धत आणि योजना बघून महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने यामध्ये गुंतवणूक केली आहे. 



अजिंक्य रहाणेने देखील या 'मेरा किसान' कंपनीत गुंतवणूक केली असून तो या कंपनीचा ब्रँड ऍम्बेसेडर देखील आहे. 'मेरा किसन'सारख्या शाश्वत सेंद्रिय कृषी व्यवसायाशी जुळणे हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मला विश्वास आहे, सेंद्रीय पदार्थ यांच उत्तम आरोग्यात चांगल योगदान आहे. या गुंतवणूकीतून हे अधोरेखित होतं की आमचं गोल एकच आहे. मी या प्रवासाचा भाग होण्यासाठी खूप उत्सुक असल्याचं अजिंक्य सांगतो. 



'मेरा किसानमार्फत आम्हाला चांगल आरोग्य देऊन सुदृढ भारत घडवायचा आहे. अजिंक्य रहाणेंनी आमच्यासोबत येणं ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे,' अशी भावना मेरा किसानचे संस्थापक प्रशांत पाटील यांनी व्यक्त केली.