Ajinkya Rahane : सामन्यादरम्यान रहाणेने केलं असं की...; चाहत्यांनाही विश्वास बसेना!
India vs West Indies 1st Test: अनेकांचं लक्ष होतं ते उपकर्णार अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) खेळीवर. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उत्तम कामगिरी केली. ज्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरूद्ध उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली.
India vs West Indies 1st Test: डोमिनिका टेस्टमध्ये अखेर भारताने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला. या सामन्यात भारताचा 1 इनिंग आणि 141 रन्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान अनेकांचं लक्ष होतं ते उपकर्णार अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) खेळीवर. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये उत्तम कामगिरी केली. ज्यामुळे त्याला वेस्ट इंडिजविरूद्ध उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली. मात्र या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) एका कृत्याने चाहते मात्र हैराण झाले.
रोचने घेतली अजिंक्यची विकेट
टीम इंडिया फलंदाजी करत असताना 130व्या ओव्हरमध्ये केमार रोचकडे गोलंदाजी करत होता. यावेळी विंडीज संघाचा कर्णधार क्रेग ब्रॅथवेटचा हा निर्णय योग्य ठरला. रोचला ओव्हरच्या पहिल्याच बॉलमध्ये मोठी विकेट मिळाली. रहाणेने केवळ 11 बॉल्समध्ये 3 रन्स केले.
अजिंक्यच्या विकटने सर्वजण हैराण
या सिरीजमध्ये सीनियर बॅट्समन अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane ) उपकर्णधार बनवण्यात आलंय. अजिंक्य ( Ajinkya Rahane ) ज्या प्रकारे शॉट खेळला त्याने सहजतेने रोचला विकेट दिली. अजिंक्यच्या या विकेटमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रहाणेच्या अशा शॉटवर कोणाचाही विश्वास बसला नाही. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final-2023) तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यामुळे रहाणे ( Ajinkya Rahane ) मोठी खेळी खेळेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र त्याच्या या शॉर्टने सर्वांची निराशा झाली.
पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय
वेस्ट इंडिज विरूद्ध भारत यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्यात भारताने विजय मिळवलाय. एक इनिंग आणि १४१ रन्सने टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव केलाय. पहिली टेस्ट जिंकत भारताने सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतलीये. टीम इंडियाने ( Team India ) पहिल्या इनिंगमध्ये ५ विकेट्य गमावत ४२१ रन्सवर डाव घोषित केला. तर दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्ट इंडिजची टीम 130 रन्सवर ऑल आऊट झाली आणि भारताचा विजय झाला.
अश्विनने पटकावल्या 12 विकेट्स
डॉमिनिका टेस्टमध्ये पुन्हा एकदा आर.अश्विनच्या फिरकीची जादू दिसून आली. या कसोटीच्या विजयाचा खरा शिल्पकार अश्विन ठरला. अश्विनने दोन्ही डावात 12 विकेट घेतल्या आहेत. यावेळी त्याने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या.