कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेतेश्वर १२६ धावांवर तर अजिंक्य १०० धावांवर नाबाद आहे. त्यांच्या शतकी खेळीमुळे भारताने पहिल्या दिवशी तीन बाद ३३९ धावा केल्या. 


अजिंक्य रहाणेने जसे शतक पूर्ण केले त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये बसलेली अजिंक्य रहाणेची पत्नी राधिकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. बीसीसीआयने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय. रहाणेने कसोटीतील ९वे शतक झळकावले.