Ajinkya rahane : जुलैमध्ये टीम इंडियाला ( Team India ) वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचं आहे. या ठिकाणी टीम इंडिला 2 टेस्ट मॅच, 3 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळायचे आहेत. अशातच बीसीसीआयने शुक्रवारी वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यासाठी टेस्ट टीम आणि वनडे टीमसाठी निवड करण्यात आलीये. यामध्ये टेस्ट टीमसाठी मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya rahane ) खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा देण्यात आलीये. त्यामुळे रहाणेच्या चाहत्यांना पुन्हा एकदा रहाणे उप कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 18 महिन्यांनी केलं कमबॅक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) सामन्यासाठी टीम इंडियामध्ये अजिंक्य रहाणेने तब्बल 18 महिन्यांनी कमबॅक केलं. यावेळी त्याला मिळालेल्या संधीचं त्याने सोनंही केलं. या सामन्यामध्ये टीम इंडियाचे सर्व टॉप ऑर्डर फलंदाज फेले गेले मात्र मराठमोळा अजिंक्य रहाणे एकटा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पुरुन उरला. 


या सामन्यापूर्वी बीसीसीआयने अजिंक्यचा Ajinkya rahane एक व्हिडीओ पोस्ट केला होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship ) अजिंक्यने 18 महिन्यांनी कमबॅक केलं होतं. रहाणेने भारताकडून 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शेवटची सिरीज खेळली होती. या सिरीमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर टीम इंडियामधून अजिंक्य रहाणेला ( Ajinkya rahane ) बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 


बीसीसीआयच्या व्हिडीओमध्ये अजिंक्य ( Ajinkya rahane ) म्हणाला होता की, दक्षिण आफ्रिकेनंतर मला टीममधून ड्रॉप करण्यात आलं होतं. त्यावेळी माझ्या कुटुंबाने मला भरपूर पाठिंबा दिला. भारतासाठी खेळण्याच्या स्वप्नाला मी नेहमीच जिवंत ठेवलं होतं. भारतासाठी खेळणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं असल्याचं मी माझ्या कुटुंबाला सांगितलं होतं."


अजिंक्य रहाणेचे व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर अजिंक्यवर ( Ajinkya rahane ) बीसीसीआयने पुन्हा विश्वास ठेवलाय. यावेळी त्याला टीममध्ये तर संधी दिलीच, सोबत उप कर्णधार पदाची धुराही सोपवली. त्यामुळे रहाणेचे शब्द कुठेतरी खरे झाल्याचं दिसून आलं आहे. 


वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट टीम इंडियाची निवड


रोहित शर्मा ( कर्णधार ), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे ( उपकर्णधार ), केएस भरत ( विकेटकीपर ), इशान किशन ( विकेटकीपर ), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी