मुंबई : आयपीएल २०२० मध्ये आरसीबीला किंग्स इलेवन पंजाबच्या विरोधात ९७ धावा करून पराजय स्विकारावा लागला होता. बंगलोरच्या या अपयशानंतर भारतीय क्रिकेट टीमच्या माजी जलद गोलंदाज अजित आगरकरने टीमचा कॅप्टन विराट कोहलीवर टीका केली आहे. विराट कोहलीने केलेल्या २ चुकांवर अजित आगरकरने टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये कोहलीने २० वी ओवर टाकण्यासाठी शिवम दुबेला संधी दिली. शिवमने पहिल्या दोन ओव्हरमध्ये १० धावा देऊन दोन विकेट घेतल्या होत्या. मात्र आगरकरला असं वाटतं होतं की, विराटने शिवम दुबेला गोलंदाजीसाठी पाठवायला नको होतं. कारण पंजाबचा कॅप्टन केएल राहुल मैदानात होता. 



केएल राहुल पूर्णपणे सेट होता. या ओव्हरमध्ये त्याने शिवम दुबेच्या ओव्हरमध्ये २३ धावा घेतल्या आणि पंजाबचा स्कोर २०६ पर्यंत पोहोचला. अजित आगरकरने म्हटलं की, शिवम दुबेने पहिल्या दोन ओव्हर चांगल्या केल्या. मात्र जेव्हा शेवटच्या ओव्हरची गोष्ट येते तेव्हा एक फलंदाज शतक होऊन खेळत आहे. तेव्हा एका महत्वाच्या गोलंदाजाकडून गोलंदाजी करून घेणं महत्वाचं आहे. कारण टी २० मध्ये काही चेंडूंनी खेळ बदलून जातो.