मुंबई : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यामध्ये सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये आज दुसरा सामना विशाखापट्टनम येथे खेळला जाणार आहे. या वनडे सामन्याच्या आधी क्रिकइन्फोसोबत बोलताना भारतीय टीमचा माजी गोलंदाज अजीत आगरकरने आपली प्लेइंग इलेवन सांगितली आहे. त्याने कुलदीप यादवला त्याच्या प्लेइंग इलेवनमध्ये जागा दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमचा माजी गोलंदाज अजीत आगरकरने कुलदीप यादवला रविंद्र जडेजाच्या जागी घेतलं आहे. एका इंटरव्यूमध्ये त्याने म्हटलं की, "मी दुसऱ्या वनडेमध्ये माझ्य़ा टीममध्ये कुलदीप यादवला घेईल. कारण तो विकेट घेणार गोलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. त्याने मधल्या ओव्हरमध्ये देखील विकेट घेतल्या आहेत.''


''मी रविंद्र जडेजाच्या जागी कुलदीप यादवला टीममध्ये जागा देईल. मला वाटतं की, 6 फलंदाजांसोबत भारतीय टीम खूप मजबूत आहे. सध्या आपल्याला आपली गोलंदाजी मजबूत केली पाहिजे. यासाठी जडेजाच्या जागी कुलदीपला टीममध्ये घेतलं पाहिजे.''


'जर भारत दोन स्पिनर आणि तीन जलद गोलंदाजांसोबत खेळतो तर निश्चितच भारताला जडेजाच्या जागी कुलदीप यादवला टीममध्ये जागा दिली पाहिजे.'


अजित आगरकरची टीम


रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अंबाती रायडू, एमएस धोनी (विकेटकीपर), ऋषभ पंत, कुलदीप यादव, युज्वेंद्र चहल, खलील अहमद, मोहम्मद शमी, उमेश यादव