धोनीला निवृत्तीचा सल्ला देणं या क्रिकेटरला पडले महागात
टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवत टी-२० सीरिज आपल्या नावावर केली. मात्र, एक वाद असा आहे जो संपण्याचं नावचं घेताना दिसत नाहीये
नवी दिल्ली : टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवत टी-२० सीरिज आपल्या नावावर केली. मात्र, एक वाद असा आहे जो संपण्याचं नावचं घेताना दिसत नाहीये. हा वाद आहे महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या निवृत्तीसंदर्भात.
न्यूझीलंड विरोधातील दुसऱ्या टी-२० मॅचमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर महेंद्रसिंद धोनीला आता टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घ्यायला हवी अशी मागणी होऊ लागली. धोनीने निवृत्ती घ्यायला हवी असं काही क्रिकेटर्सने म्हटलं तर काहीजण धोनीच्या पाठीशी उभे राहिले.
धोनीने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली पाहिजे असे म्हणणाऱ्यांमध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण आणि अजित आगरकर यांचा समावेश होता.
टीम इंडियाचा माजी बॉलर अजित आगरकर याने एका मुलाखतीत म्हटले की, धोनीच्या जागी आता दुसऱ्या प्लेअरला संधी देण्याची वेळ आली आहे. वन-डे क्रिकेटमध्ये धोनीची भूमिका योग्य आहे मात्र, टी-२० क्रिकेटमध्ये वेगळी आहे. तुम्ही जोपर्यंत टीमचे कॅप्टन असता तोपर्यंत सर्व ठिक आहे. मात्र, सध्या एक बॅट्समन म्हणून आम्ही त्याला मिस करत आहोत.
अजित आगरकरने दिलेल्या या मुलाखतीनंतर ट्विटर युजर्सने त्याच्यावर हल्ला चढवला. धोनीच्या चाहत्यांनी आगरकरचा चांगलाच क्लास घेतला. धोनीच्या समोर आगरकर काहीच नाहीये असं कुणी म्हटलं. तर कुणी म्हटलं की, आधी आगरकरने आपलं करिअर पहावं आणि नंतर धोनीसंदर्भात बोलावं.
अजित आगरकर व्यतिरिक्त आकाश चोपडा, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही धोनीने दुसरा पर्याय शोधला पाहिजे असं म्हटलं होतं.