नवी दिल्ली : क्रिकेटच्या जगतात अनेक दुर्घटना याआधीही घडलेल्या आहेत. अशीच एक दुर्घटना पुन्हा मैदानावर घडली असती पण इग्लंडच्या माजी कॅप्टनच्या प्रसंगावधानामुळे ही दुर्घटना थोडक्यात टळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इग्लंडचा माजी कॅप्टन एलेस्टर कूक सध्या एका 'जबरदस्त कॅच'मुळे चर्चेत आलाय... कारण या कॅचमुळे एका रिपोर्टरचा जीवही वाचलाय. 


मैदानावर एक मुलाखत देत असताना कूकचे सहकारी मैदानात प्रॅक्टीस करत होते. याच दरम्यान कूकच्या डाव्या बाजुला खेळणाऱ्या खेळाडुनं बॉल मारला... बंदुकीच्या गोळीच्या तेजीनं ही बॉल सरळ सरळ रिपोर्टरच्या डोक्याला धडकणार होता... पण... 


तेव्हाच कूकगनं आपल्या डाव्या हातानं हा बॉल पकडला. अवघ्या काही सेकंदात... डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ही घटना घडली.


महत्त्वाचं म्हणजे ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ३४ सेकंदाचा या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. 


आपल्या शानदार फिल्डिंगसाठी एलेस्टर कूकला ओळखलं जातं. अनेकदा तो मैदानावर स्लिपमध्ये उभा राहिलेला दिसतो. त्याच्याकडे कॅच गेला तर सुटणं कठिण आहे, हे अनेकांना माहीत आहे. सध्या कूकनं राष्ट्रीय क्रिकेट टीमच्या कॅप्टनपदावरून पायउतार होणं पसंत केलंय. त्यानंतर रूटनं टीमची धुरा सांभाळलीय.