पी. व्ही सिंधूने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत
भारताची ऑलिम्पिक रौप्य पदक विजेजी बॅडमिंटनपटून पी. व्ही सिंधूने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिने जपानच्या नोझोमी ओकुहराला पराभूत केले.
बर्मिंगहॅम : भारताची ऑलिम्पिक रौप्य पदक विजेजी बॅडमिंटनपटून पी. व्ही सिंधूने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिने जपानच्या नोझोमी ओकुहराला पराभूत केले.
पी. व्ही. सिंधूने जपानची २०१६ची चॅम्पियन नोझोमी ओकुहरा हिच्यावर मात करत एक हजार डॉलर्सच्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची जोरदार कामगिरी केली.
सिंधूने शुक्रवारी उपांत्य सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहराचे कडवे आव्हान 20-22, 21-18, 21-18 असे परतवून लावत उपांत्य फेरी गाठली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत ओकुहराने सिंधूसमोर चांगले आव्हान उभे केले.
पहिल्या गेममध्ये तिने 22-20 ने बाजी मारत सिंधूला अडचणीत आणले. मात्र पहिला गेम गमावल्यानंतर सिंधूने लढतीत जोरदार कमबॅक केले. तिने दुसरा गेम 21-18 ने जिंकून लढतीत बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये ओकुहरावर 21-18 ने मात करून सामना खिशात टाकला.