Ambati Rayudu Enters Into Politics: टीम इंडियाचा माजी खेळाडू अंबाती रायडू (Ambati Rayudu) याने आयपीएल 2023 च्या फायनल सामन्यात निवृत्ती जाहीर केली होती. चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात अंतिम सामना सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी आयपीएलला निरोप दिला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. अशातच आता अंबाती रायडूने (Ambati Rayudu New Innings) नव्या इनिंगची घोषणा केली आहे. रायडू आता लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी जमिनीवर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अंबाती रायडूने त्याच्या मूळ जिल्ह्यातील गुंटूरचा दौरा केला. त्यावेळी त्याने स्थानिक पत्रकारांशी चर्चा केली. त्यावेळी त्याने आपण लवकरच राजकारणात (Ambati Rayudu In Politics) येणार असल्याचं जाहीर केलं. मी लवकरच आंध्र प्रदेशातील लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात प्रवेश करणार आहे. त्याआधी मी जिल्ह्याच्या विविध भागात जाऊन लोकांची नाडी जाणून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचं ठरवलंय, असंही अंबाती रायडू (Ambati Rayudu) म्हणाला आहे.


राजकारणात कसं जायचं? आणि कोणतं व्यासपीठ निवडायचं? याचा ठोस कृती आराखडा मी लवकरच लोकांसमोर घेऊन येईन, असं अंबाती रायडू म्हणाला आहे. त्यामुळे आता आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) एकच चर्चेला उधाण आलंय. आगामी लोकसभा निवडणुकीत गुंटूर किंवा मछलीपट्टणममधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. मात्र, आता रायडूने या वृत्तावर अस्पष्टता दर्शविली आहे. रायडूने या वृत्त फेटाळून लावलंय.


आणखी वाचा - हातात काठी चेहऱ्यावर वेदना, तरीही झुंजतोय ऋषभ पंत; नवा Video पाहिलात का?


दरम्यान, अंबाती रायडू येत्या काळात वाईएसआर कांग्रेस पार्टीमध्ये (YSR Congress party) प्रवेश करू शकतो, असे संकेत मिळाले आहेत. रायडूने 19 एप्रिल रोजी ट्विट केलं होतं, त्यात त्याने राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांच्या भाषणाचं कौतुक केलं होतं. राज्यातील प्रत्येकाचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, असं रायडू म्हणाला होता. त्यामुळे आता रायडू वायएसआरमध्ये प्रवेश करणार असल्याचं दिसतंय.