Ambati Rayudu :  सन 2019 मध्ये विश्वचषक क्रिकेट संघात निवड समितीनं संधी न दिल्यानं त्या अंबाती रायुडूनं क्रिकेटला रामराम ठोकण्याचा निर्णय जाहीर केला होता. आपण क्रिकेटच्या सर्व स्वरुपातून निवृत्ती घेत असल्याचं त्यानं लेखी पत्र लिहीत बीसीसीआयला कळवलं होत. अंबाती रायुडूच्याऐवजी विजय शंकरला विश्वचषकासाठी संधी देण्यात आल्यानंतर त्यानं नाराजी दर्शवणारं ट्विट केलं होतं. निवड समीने अन्याय केल्याची नाराजी त्याने जाहीरपणे उघड केली होती. आता मात्र, तब्बल 3 वर्षानंतर अंबाती रायुडू याने पून्हा एकदा आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. BCCI अध्यक्षांनी करिअर बर्बाद केले असं म्हणत त्याने गंभीर केले आहेत.  अंबाती रायुडू याच्या गंभीर आरोपांमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. 


2019 विश्वचषक क्रिकेट संघाची निवड करताना नेमकं काय झालं होते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबाती रायुडूच्याऐवजी विजय शंकरला विश्वचषकासाठी संधी देण्यात आल्यानंतर त्यानं नाराजी दर्शवणारं ट्विट केलं होतं. यामुळे शिखर धवन आणि विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतरही बीसीसीआयनं  संधी दिली नाही. अंबाती रायुडूला डावलून बीसीसीआयनं रिषभ पंत आणि मयांक अग्रवाल यांना संधी दिली होती.  त्यावेळी तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि चौथ्या क्रमांकावर खेळण्याचा प्रबळ दावेदार होता.


2019 विश्वचषक क्रिकेट संघात निवड का झाली नाही? अंबाती रायुडूचा खळबळजनक दावा


बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी आपल्या मुलाचे करिअर घडवण्यासाठी माझे करिअर बर्बाद केले असा गंभीर आरोप अंबाती रायुडू याने केला आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शिवलाल यादव यांच्यामुळे मला भारतीय संघात जास्त काळ खेळता आले नाही. शिवलाल यांना त्यांच्या मुलाला भारतीय संघाकडून खेळवायचे होते. इंग्लंडमधील विश्वचषकासाठी मला तयारी करण्यासाठी सांगण्यात आले होते. भारतीय संघातील माझे स्थान जवळपास निश्चित होते. पण संघ निवडताना मात्र माझी निवड करण्यात आली नाही. माझ्या जागी विजय शंकरला संघात संधी देण्यात आली असा आरोप त्याने केला आहे.   अंबाती रायुडूनं 55  एकदिवसीय लढतीत 1 हजार 694 धावा केल्या आहेत. तर 6 टी-ट्वेन्टी सामन्यांमध्ये 42 धावा केल्या आहेत.


पुन्हा खेळण्याची इच्छा


क्रिकेट विश्वचषक संघात निवड न झाल्यानं निराशेमध्ये निवृत्तीची घोषणा केलेला क्रिकेटपटू अंबाती रायुडूनं आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत त्यानं हैदराबाद क्रिकेट संघटनेला पत्राद्वारे आपण निवृत्ती मागे घेत असून आपल्यात अजून खूप क्रिकेट शिल्लक असल्याचं म्हटलं होते. क्रिकेटच्या सर्व स्वरुपात पुन्हा खेळण्याची इच्छा त्यानं व्यक्त केली होती. निवृत्तीचा निर्णय आपण भावनेच्या भरात घेतला असल्याचंही त्यानं म्हटलं होते.