नवी दिल्ली : जगप्रसिद्ध बॉक्सर आमीर खान पत्नीला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर त्याला त्याच्या संपत्तीमधील निम्मी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी वंशाचा ब्रिटनचा लोकप्रिय बॉक्सर आमीर खान पत्नी फरयाल मकदुम हिला घटस्फोट देत आहे. द डेली स्टारने या संदर्भातील बातमी दिली आहे. त्यानुसार आमीर खानला १०० कोटी रुपये म्हणजे १ अब्ज रूपये मोजावे लागतील असे सांगितले जात आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, आमीरने घटस्फोट घेतला तर त्याला किमान १ अब्ज रूपये पत्नीला द्यावे लागतील. आमीरची बायको फरयाल हिच्या म्हणण्यानुसार आमीर सतत दुस-या बायकांसोबत असतो, दारू पितो, पार्ट्या करतो आणि स्वतःला तरीही मुसलमान म्हणवतो. याउलट आमीरच्या म्हणण्यानुसार त्याची बायको त्याच्याशी प्रामाणिक नाही व दुसर्‍या बॉक्सरबरोबर तिचे संबंध आहेत. फरयाल ही अमेरिकन मॉडेल असून तिला आमीरपासून एक मुलगी आहे व दुसर्‍यांदा ती प्रेग्नंट आहे.


आमीरची संपत्ती -


आमीरकडे ७ लाख पौंड किंमतीच्या कार्स, १६ लाख पौंड किमतीचं घर. शिवाय २५ दशलक्ष पौंडांची मालमत्ता आहे. या २५ दशलक्षांपैकी निम्मी म्हणजे किमान १२.५ दशलक्ष पौंड त्याला पत्त्नीला मुलांचा सांभाळ करण्याचा खर्च म्हणून द्यावे लागतील. २०१३ मध्ये आमीर विवाहबद्ध झाला होता.


आमीर खानचा सेक्स टेप लीक -


आमीर खानचा एक सेक्स व्हिडिओ पॉर्न साईटवर लीक झाला होता. धक्कादायक बाब ही की, या व्हिडिओ लीक करण्यामागे त्याची मॉडेल पत्नी फरयाल मखदूम हिचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये हा दावा सुद्धा करण्यात आला आहे की, बॉक्सर आमीरचे आणखी तीन सेक्स व्हिडिओज सुद्धा त्या वेबसाईट्सला देण्याची ऑफर दिली होती.