नवी दिल्ली : नवी दिल्ली : भारतीय  लेग स्पीनर अमित मिश्रा गुडघ्याच्या दुखापतीमुळे सध्या  क्रिकेटपासून दूर गेलेला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र त्याच्याबद्दल पसणार्‍या एका अफवेमुळे तो अधिक चिंतित झाला आहे. सुरेश रैना आणि एमएस वॉशिंग्टन यांच्यासोबत अमित मिश्रा देखील 'योयो'टेस्टमध्ये अपयशी झाल्याने त्याला लांब ठेवण्यात आल्याची अफवा पसरत आहे. 


यो यो टेसट ही सिलेक्शन साठीची एक फिटनेस टेस्ट आहे. पण अमित मिश्राच्या म्हणण्यानुसार त्याने अजून यो यो टेस्ट दिली नसल्याने तो अशा परिक्षांमध्ये अपयशी ठरण्याचा प्रयत्न येतच नाही.


अमित मिश्रा  सध्या फिजिओ आणि ट्रेनर यांच्याकडून येणार्‍या रिपोर्टची वाट पाहत आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यावरच हरियाणाकडून रणजी ट्रॉफी खेळणार की नाही याबाबत माहिती दिली जाणार आहे. अमित मिश्राने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) चे ट्रेनर आशिष कौशिक यांच्याशी बोलणे केले आहे तसेच त्याने अजूनही यो यो टेस्टमध्ये सहभाग घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.