`या` भीतीपोटी अमिताभ बच्चन यांनी पाहिली नाही वर्ल्डकपची फायनल! भारताच्या विजयानंतर बिग बींचा खुलासा
Amitabh Bachchan Did Not Watch Final Match : अमिताभ बच्चन यांनी भारताच्या T20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर सोशल मीडियावर केला खुलासा
Amitabh Bachchan Did Not Watch Final Match : टीम इंडियानं काल 29 जून रोजी इतिहास रचला आहे. बारबाडोसमध्ये झालेल्या टी20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारतानं साऊथ अफ्रिकेवर 7 रननं विजय मिळवला आहे. 2007 मध्ये महेंद्र सिंग धोनीच्या टीमनं टी20 वर्ल्डकप जिंकला होता. आता 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा आपण हा वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर संपूर्ण देशात असलेला आनंद आपल्याला पाहायला मिळला. सगळेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. या सगळ्यात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन हे भावूक झाले आहेत. ते इतके घाबरले की त्यांनी मॅच पाहिली नाही.
टीम इंडियानं टी20 वर्ल्डकपचा खिताब जिंकल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आधीच्या ट्विटर आणि आताच्या X अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी टीम इंडियाला शुभेच्छा देत म्हटलं की 'अश्रू... टीम इंडियामुळे आपल्या जे आनंदाश्रू आले आहेत... वर्ल्ड चॅम्पियन इंडिया!'
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर म्हटलं की 'उत्साही, भावूक आणि आशा... सगळं काही आता संपलंय... टिव्ही पाहिला नाही... जेव्हा मी पाहतो तेव्हा आपण हरतो! डोक्यात काहीच नव्हतं... फक्त टीमच्या अश्रूंसोबत माझे अश्रू वाहत आहेत.'
भारतानं साऊथ आफ्रिकाला सात रनांनी हरवलं आहे. मॅचच्या नंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं इंटरनॅशनल टी20 फॉर्मेटमध्ये निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. दोघांनी निवृत्त झाल्याची बातमी देत आनंद असलेल्या चाहत्यांना भावूक केलं. विराट म्हणाला, हा भारतासाठी असलेला माझा अखेरचा टी20 वर्ल्डकप होता. आता येणाऱ्या पीढीला ही जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे.
अनुष्का शर्मानं विराट आणि टीम इंडियासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिनं यावेळी वामिकाच्या भावना काय होत्या ते देखील सांगितलं. तर दुसरीकडे विराटचा अनुष्का आणि मुलांनी व्हिडीओ कॉलवर बोलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
हेही वाचा : ज्या मातीत विजय मिळवला त्याच मातीला चाखून प्रणाम, रोहित शर्माचा भावुक करणारा Video
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्याविषयी बोलायचे झाले तर अमिताभ हे सध्या त्यांच्या 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत प्रभास, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. .