मुंबई : World Cup 2019 च्या अंतिम क्रिकेट सामन्यात मोठी चूरस पाहायला मिळाली. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात चांगली लढत झाली. या सामन्यात दोन्ही संघ सरस ठरलेत. हार-पराजय पाहायलाच मिळाला नाही. दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेत जिंकल्याचे प्रथमच पाहायला मिळालेत. ५० षटकात सामना टाय झाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमानुसार सुपर ओव्हर खेळविण्यात आली. येथेही सामना टाय झाला. त्यामुळे पुढे काय करायचे हा प्रश्न होता. पंचानी जो निर्णय घेतला तो इंग्लंडच्या पथ्यावर पडला आणि ते विश्वविजेते म्हणून घोषित करण्यात आले. मात्र, पंचानी ज्या आधारे विजय घोषित केला, त्यावर आता जोरदार टीका होत आहे. अनेक महान खेळाडूंनी याबाबत नापसंती व्यक्त केली आहे. आता तर बिग बी अमिताभ बच्चन यांनी यावर एक भन्नाट विनोद केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर देखील टाय झाली. अशा या चित्त थरारक लढतीत सामन्यात सर्वाधिक चौकार मारलेल्या संघाला विजयी घोषीत करण्यात ठरले. त्यानुसार इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले. आयसीसीच्या या सुपर ओव्हरच्या नियमावर सर्वच स्तरांतून टीका होत आहे. आता तर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर आयसीसीच्या नियमांवर जोरदार विनोद शेअर केला आहे. या विनोदाची आता खूप चर्चा होत आहे.


अमिताभ यांनी विनोद करताना म्हटलेय,


‘तुमच्याकडे २००० रुपये, माझ्याकडेही २००० रुपये, तुमच्याकडे २००० रुपयांची एक नोट, माझ्याकडे ५००च्या चार नोटा, कोण अधिक श्रीमंत?,


आयसीसी : ज्याच्याकडे ५००च्या चार नोटा आहेत तो श्रीमंत,’ अशी उपरोधिक टीका बिग बी यांनी शेअर केली आहे.