Amithabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) चक्क फुटबॉलच्या मैदानावर उतरले. अमिताभ यांच्यासह होते फुटबॉल जगतातले महानायक क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि लियोनेल मेसी. (Lionel Messi) सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये एक विशेष सामना  (PSG Vs Saudi All-Stars Friendly Match​) आयोजित करण्यात आला होता. (Sport News in Marathi) या सामन्याचं उदघाटन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमिताभ बच्चन यांनी सौदी अरेबियातील ब्लॉकबस्टर सामन्यापूर्वी रोनाल्डो, मेस्सी यांचे स्वागत केले (Amitabh Bachchan Greets Cristiano Ronaldo, Lionel Messi Ahead of Blockbuster Match In Saudi Arabia)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रियाधमध्ये पॅरिस सेंट जर्मेन आणि रियाध इलेव्हन या दोन टीम्समध्ये प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला. लियोनेल मेसीने पॅरिस सेंट जर्मेन टीमचं नेतृत्व केले. तर रोनाल्डो रियाध इलेव्हनचा कर्णधार होता. अमिताभ बच्चन या सामन्यात प्रमुख अतिथी होते. अमिताभ बच्चन यांनी दोन्ही टीम्सचा फुटबॉलपटूंची भेट घेतली. या सामन्यात किलियन एम्बापे, सर्जिओ रामोस आणि नेमारही सहभागी झाले. तर सौदी अरेबियाचे स्टार सलेम अल दावसारी आणि सौद अब्दुलहमीदही या सामन्यात खेळले. 



रोनाल्डो गुरुवारी पुन्हा एकदा मेस्सीचा सामना रंगला होता. रोनाल्डो सौदी ऑल-स्टार इलेव्हनकडून लिओनेल मेस्सीच्या पॅरिस सेंट-जर्मेनविरुद्ध मैत्रीपूर्ण सामन्यात खेळले. क्लबच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2025 पर्यंत चालणार्‍या अल नासरशी करार केल्यापासून रोनाल्डो पहिल्यांदाच सौदी अरेबियामध्ये दाखल झाला आहे.