मुंबई : टी नटराजन हा डाव्या हाताने खेळणारा मध्यम गतीचा बॅालर आहे. आयपीएल 2020 मध्ये उत्कृष्ट कामगिरीनंतर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली. तेथे त्याने भारतासाठी उत्कृष्ट बॅालिंग केली. ब्रिटन टेस्ट मॅच जिंकणार्‍या भारतीय क्रिकेट संघात नटराजनही खेळत होता. त्यानंतर, त्याच्या खेळामुळे खूश होऊन महिंद्रा अँड महिंद्रा मोटर्सचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी नटराजनला Mahindra Thar  भेट केली आहे. नटराजनने या गाडीची फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेत त्याने आनंद महिंद्रा यांना रिटर्न भेट देखील दिली आहे. त्याने त्याची गाब्बा टेस्टची जर्सी आनंद महिंद्राला भेट केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


टी नटराजनने ट्विटरवर लिहिले की, "भारतासाठी क्रिकेट खेळणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य आहे. मी असाधारण मार्गावरुन पुढे चालत गेलो. या मार्गावर मला लोकांकडून इतकं  प्रेम आणि आपुलकी मिळाली, याचा मी विचार देखील केला नव्हता.


दिग्गज लोकांकडून मिळालेले समर्थन आणि उत्साहामुळे मला अशक्य गोष्टींवर मात करण्याचा मार्ग शोधण्यास मदत मिळाली. आज जेव्हा मी सुंदर महिंद्रा थार घरी घेऊन जात आहे, मी आनंद महिंद्राबद्दल  मनापासून कृतज्ञ आहे. त्यांनी माझ्या प्रवासाला ओळखले. मी भरोसा करतो की, तुम्हाला माझी गाब्बा टेस्टमध्ये घातलेली आणि माझी सही केलेली जर्सी मिळाली असेल."



नटराजन तामिळनाडूतील सलेम जिल्ह्यात छोट्याशा गावात रहाणार खेळाडू आहे. तो एका सामान्य कुटुंबातून आलेला आहेत. अनेक संघर्षांना सामोरे जात त्याने क्रिकेटमध्ये आपले करिअर केले. पुढे जाऊन तो तमिळनाडूकडून खेळला. मग तो आयपीएलच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला. यॉर्कर किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या नटराजनला प्रथम पंजाब किंग्सने विकत घेतले आणि त्याच्यावर बरेच पैसे खर्च केले. पण दुखापतीमुळे तो जास्त खेळू शकला नाही, म्हणून मग संघाने त्याला रिलीज केले.


त्यानंतर गेल्या वर्षी आयपीएल 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादने त्याला खेळण्याची संधी दिली. इथल्या शेवटच्या षटकात, या खेळाडूने आपल्या यॉर्करद्वारे विरोधी फलंदाजाचे हाल करुन सोडले. आयपीएल 2020 मध्ये त्याने 16 सामन्यात 16 बळी घेतले. या खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर, त्याची टीम इंडियामध्ये  निवड झाली.


खरेतर वरुण चक्रवर्ती भारतीय टीमसाठी खेळणार होता, परंतु त्याला दुखापत झाल्यामुळे टी नटराजनला  मुख्य संघात प्रवेश मिळाला. त्यानंतर जे घडले ते तुम्ही पाहिले आहेच.