`मी तुला वर्षभरापूर्वी कार गिफ्ट करण्याची ऑफर दिली, पण तू...`, आनंद महिंद्रांची शीतल देवीसाठी पोस्ट, `यापुढे कधीच...`
उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पॅरिस पॅरालम्पिक्समध्ये (Paris Paralympics) लक्षवेधी कामगिरी कऱणाऱ्या तिरंदाज शीतल देवीचं (Sheetal Devi) कौतुक केलं आहे.
उद्योजक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पॅरिस पॅरालम्पिक्समध्ये (Paris Paralympics) लक्षवेधी कामगिरी कऱणाऱ्या तिरंदाज शीतल देवीचं (Sheetal Devi) कौतुक केलं आहे. तिच्या कौशल्याने प्रभावित झालेल्या आनंद महिंद्रा यांनी तिला आपल्याकडून भेट म्हणून 2023 त्या रेंजमधील कारचा स्विकार करावा अशी विनंती केली आहे. मात्र शीतल देवीने आपल्या वयाची 18 वर्षं पूर्ण झाल्यानंतरच कार स्विकारु असं सांगितलं आहे. 2025 मध्ये शीतल देवी 18 वर्षांची होणार आहे.
शीतल देवीने 31 ऑगस्टला पॅरिस पॅरालम्पिकमध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे आनंद महिंद्रा भारावले असून, आपण आपलं आश्वासन पूर्ण कऱण्यासाठी वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे. रँकिंग फेरीत जवळपास एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केल्यानंतर, शीतल देवी प्री-क्वार्टर फायनलमध्ये चिलीच्या मारियाना झुनिगाकडून अत्यंत चुरशीच्या लढतीत केवळ एका गुणाच्या फरकाने पराभूत झाली. तिच्या बुल्सआय शॉटला मोठ्या प्रमाणात टाळ्या मिळाल्या. तिचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
आनंद महिंद्रा यांनी पोस्टमध्ये शीत देवीचं कौतुक केलं असून म्हटलं आहे की, “असाधारण धैर्य, कटिबद्धता आणि कधीही न सोडण्याची भावना पदकांशी जोडलेली नाही. शीतलदेवी, तू देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान आहेस".
आपण कार गिफ्ट करण्यासंबंधी दिलेल्या आश्वासनाबद्दल आनंद महिंद्रा म्हणाले की, "जवळपास एक वर्षापूर्वी तुझ्या जबरदस्त कामगिरीला सलाम करत मी तुला आमच्या रेंजची कार स्विकारण्याची विनंती केली होती. तुझ्यासाठी कार कस्टमाईज केली जाईल. त्यावेळी तू आपण 18 वर्षांची झाल्यावर, म्हणजेच पुढच्या वर्षी ही ऑफर स्विकारु असं म्हटलं होतंस. हे आश्वासन पूर्ण कऱण्यासाठी मी वाट पाहत आहे. आणि इतर कोणीही माझं #MondayMotivation होऊ शकत नाही".
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी गतवर्षी शीतल देवीला कस्टमाइज कार गिफ्ट करण्याची घोषणा केली होती.
शीतल देवीचा जन्म १० जानेवारी २००७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाडमधील लोईधर गावात झाला. जन्मताच तिला फोकोमेलिया हा दुर्मिळ आजार होता. या आजारामुळे शरीर विकसित होत नाही. त्यामुळे तिचे हात पूर्णपणे तयार झाले नाहीत. पण यानंतरही तिने हार पत्करली नाही आणि धनुर्विद्येचं प्रशिक्षण घेत आज जगाला दखल घेण्यास भाग पाडलं आहे.