मुंबई : ऑस्ट्रेलियन खेळाडू अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाची बातमी ममोर येताच जगभरात शोककळा पसरली आहे. 46 वर्षीय खेळाडूचा शनिवारी रात्री कार अपघात झाला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. जगातील महान ऑलराउंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. दरम्यान सायमंड्सच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीसोबतचा त्याचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेटच्या मैदानातून दूर झाल्यानंतर अँड्र्यू सायमंड्स बिग बॉसच्या सिझनमध्येही दिसला होता. त्यावेळी त्याची आणि सनी लिओनीची बॉन्डीग चांगली झाल्याच्या चर्चा होत्या. दरम्यान हा व्हायरल झालेला फोटो तेव्हाचाच आहे. 


रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या 5व्या सीझनमध्येही सायमंड्स सहभागी झाला होता. तो दोन आठवडे या शोमध्ये पाहुणा म्हणून राहिला होता. यादरम्यान, त्याला बिग बॉसच्या घरात इंग्रजी बोलण्याची परवानगी देखील देण्यात आली होती, ते शोच्या नियमांच्या विरोधात होतं.



बिग बॉस 5 मध्ये दिसलेला अँड्र्यू सायमंड्स देखील यावेळी बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीसोबत खास बॉन्ड दिसला होता. बिग बॉसनंतर अँड्र्यू सायमंड्स 'सेलिब्रिटी क्रिकेट लीग'मध्येही दिसला होता. यादरम्यान त्याने बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसूसोबत स्टेजवर एक दमदार परफॉर्मन्स दिला होता.



अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. शनिवारी रात्री उशिरा कार अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या टीमला त्याचे प्राण वाचवण्यात यश मिळालं नाही. त्याच्या निधनानं क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.