...तर तो इंग्लंडच्या राष्ट्रीय टीममध्ये दिसला असता; Andrew Symonds मोठा खुलासा
अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. 14 मे रोजी रात्री उशिरा त्याचा कार अपघात झाला.
मुंबई : नुकतंच ऑस्ट्रेलिया क्रिकेटला अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे. एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला होता. याचवेली इंग्लंडच्या टी-20 आणि एकदिवसीय टीमचे नवे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी सायमंड्सबाबत मोठा खुलासा केला आहे.
मॅथ्यू मॉट यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलियाचा दिवंगत अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सने इंग्लंडकडून खेळण्याचा विचार केला होता. कारण त्याच्याकडे यूकेचा पासपोर्ट होता. सायमंड्स या महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये कार अपघातात मृत पावला.
मॉट पुढे म्हणतात, "ही ऑफर त्याच्यासाठी खूप चांगली होती, मुळात त्याला एक चांगली संधी होती आणि त्याचे पालकंही तिथेच होते. मात्र ऑस्ट्रेलियासाठी खेळण्यास उत्सुक होता आणि ते त्याचे बालपणीचे स्वप्न होतं.
सायमंड्सला काउंटी टीम ग्लुसेस्टरशायरने बिगर परदेशी खेळाडू म्हणून करारबद्ध केलं होतं. त्यावेळी 19 वर्षीय सायमंड्सने सिझनमध्ये चार शतकं झळकावली होती. त्यावेळी त्याला पाकिस्तान दौर्यासाठी इंग्लंड अ संघात खेळण्याची ऑफर देण्यात आली होती.
सायमंड्सने नासेर हुसेनच्या नेतृत्वाखालील टीमकडून खेळण्याची ऑफर नाकारली आणि त्याऐवजी ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची घोषणा केली. एका वर्षानंतर तो त्यांच्या ए टीममध्ये सामील झाला.
अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. 14 मे रोजी रात्री उशिरा कार अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या टीमला त्याचे प्राण वाचवण्यात यश मिळालं नाही. त्याच्या निधनानं क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.