मुंबई : कौशल्य आणि आपल्या क्रिकेटमधील कामगिरीमुळे अँड्र्यू सायमंड्स सगळ्यांचा लक्षात आहे. मात्र त्यापलिकडे तो मैदानात किंवा मैदानातबाहेर झालेल्या वादासाठी जास्त चर्चेत आला. याच वादग्रस्त घटनांचा त्याच्या करिअरवरही वाईट परिणाम झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. शनिवारी रात्री उशिरा कार अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या टीमला त्याचे प्राण वाचवण्यात यश मिळालं नाही. त्याच्या निधनानं क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 


सायमंड्स आणि वाद
2008 मध्ये सिडनीमध्ये झालेल्या सामन्यात हरभजन सिंग आणि सायमंडसमध्ये वाद झाला. त्यानंतर हरभजनवर 3 सामन्यांची बंदी घालण्यात आली. हा वाद पुढे मोठा झाला. टीम इंडियाने हरभजनची साथ देऊन ही बंदी उठवायला लावली. एवढंच नाही तर आरोप बिनबुडाचे असल्याचंही पुढे सिद्ध झालं. 


2009 मध्ये एका मुलाखती दरम्यान ब्रेंडन मॅक्यूलमबद्दल वादग्रस्त विधान केलं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डला दंड ठोठावण्यात आला. टी 20 वर्ल्ड कप दरम्यान दारूवरून वाद झाला होता. त्यामुळे सायमंड्सला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आलं. 


या वादग्रस्त घटनांचा 2008-09 नंतर त्याच्या कारकीर्दीवर गंभीर परिणामही झाला. त्यामुळे त्याचं क्रिकेटमधील करिअर संपुष्टात आलं. एवढंच नाही पुढे आयपीएलमध्येही त्याचं खास मित्रासोबत पैशांवरून भांडण झालं होतं. 


सायमंड्सचे करिअर
अँड्र्यू सायमंड्सला जगात महान क्रिकेटर म्हणून ओळखलं जात होतं. ऑस्ट्रेलियाकडून त्याने 26 कसोटी, 198 वन डे आणि 14 टी 20 सामने खेळले होते. त्याने 198 वन डे सामन्यात 1462 केले. तर कसोटीमध्ये 5088 रन केले. टी 20 सामने 337 धावा केल्या. त्याने 39 आयपीएल सामने खेळले. 2003 आणि 2007 मध्ये वर्ल्ड कप देशाला जिंकून देण्यात त्याचा वाटा होता.