तिसऱ्या टी-२० आधी श्रीलंकेला झटका
भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसऱा आणि अखेरचा सामना खेळवला जातोय. मात्र या सामन्याआधीच श्रीलंकेला मोठा झटका बसलाय.
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसऱा आणि अखेरचा सामना खेळवला जातोय. मात्र या सामन्याआधीच श्रीलंकेला मोठा झटका बसलाय.
श्रीलंकेला मोठा झटका
श्रीलंकेचा क्रिकेटर अँजेलो मॅथ्यूज दुखापतीमुळे दोन आठवडे खेळू शकणार नाहीये. स्नायूंच्या तणावामुळे त्याला या सामन्यात खेळता येणार नाही.
'ईएसपीएनक्रिकइन्फो डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, शुक्रवारी इंदूरमध्ये भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना मॅथ्यूजला दुखापत झाली.
दुसऱ्या सामन्यात झाली दुखापत
भारताविरुद्ध गोलंदाजी करताना तिसऱ्या ओव्हरमधील तिसरा चेंडू फेकताना त्याला दुखापत जाणवल्याने ओव्हर पूर्ण न करताच त्याला मैदान सोडावे लागले.
श्रीलंका संघाच्या मॅनेजरनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. यामुळे मॅथ्यूज केवळ भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०लाच मुकणार नाही तर बांग्लादेश दौऱ्यासाठीही त्याच्या उपस्थितीबाबत साशंकता आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॅथ्यूजला बरे होण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ लागेल. दरम्यान, यापेक्षाही अधिक वेळ लागू शकतो. मॅथ्यूज हा श्रीलंकेच्या संघातील अनुभवी खेळाडू आहे. यामुळेच त्याच्या अनुपस्थितीमुळे श्रीलंकन संघाच्या अडचणीत आणखी वाढ झालीये.