मुंबई : आयपीएल २०१८चा हंगाम संपलाय. रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादला ८ विकेट राखून हरवले. दोन वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नईने संपूर्ण आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. दोन वर्षात पुनरागमन करणाऱ्या चेन्नईने तिसऱ्यांदा हा खिताब जिंकलाय. याआधी २०१० आणि २०११मध्ये आयपीएलचे जेतेपद मिळवले होते. यासोबतच आयपीएलचे सर्वाधिक जेतेपद जिंकणाऱ्या चेन्नईने मुंबईशी बरोबरी साधलीये. दोन्ही संघांनी तीन-तीन वेळा आयपीएलचे जेतेपद मिळवलेय. चेन्नईचे नाव आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून घेतले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल २०१८ची फायनल झाल्यानंतर धोनी, शेन वॉटसन, चेन्नई संघाचे कौतुक केले जातेय. या सगळ्यातच आणखी एका नावाची चर्चा होतेय. ते नाव म्हणजे मयंती लंगर. आयपीएल संपल्यानंतर मोठे मोठे दिग्गज मयंती लंगरची स्तुती करतायत.


डीन जोन्स, अनिल कुंबळे आणि कुमार संगकारासारखे दिग्गज मयंती लंगरची सोशल मीडियावर जोरदार स्तुती करतायत. मयंती आयपीएल २०१८मध्ये होस्टच्या भूमिकेत दिसली होती. तिने सुंदर पद्धतीने ही क्रिकेट सोहळा होस्ट केला होता.