मुंबई : टीम इंडियातील वादामुळे कोच अनिल कुंबळेनं राजीनामा दिला आहे. भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीही अनिल कुंबळे जाणार नाही. गेल्या काही दिवसांपासून अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यामध्ये वाद सुरु असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभव पत्करावा लागला. आता टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना झाली. मात्र, यावेळी प्रशिक्षक अनिल कुंबळेविनाच टीम इंडिया वेस्ट इंडिजकडे रवाना झाली.


प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांच्यात वाद असल्याची चर्चा पुढे आली. दरम्यान, विराटने यावर पडदा टाकताना कोणताही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले होते.


अनिल कुंबळे आयसीसीच्या बैठकीसाठी लंडनमध्येच थांबला आहे. भारत आणि वेस्ट इंडिजमधील मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेला २३ जूनपासून सुरुवात होणार आहे.  


आयसीसीच्या बैठकीसाठी कुंबळे मागे थांबल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे.  भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक असलेला अनिल कुंबळे आयसीसीच्या क्रिकेट कमिटीचा सदस्य आहे. आयसीसीची वार्षिक सभा सोमवासपासून सुरू झाली असून, ही बैठक २३ जूनपर्यंत चालणार आहे. यादरम्यान अनिल कुंबळेच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट समितीची बैठक २२ जून रोजी होणार आहे.