मुंबई : वर्ल्ड कपनंतर एमएस धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा जोरात सुरु झाल्या. वर्ल्ड कप संपल्यानंतर लगेचच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचं धोनीने बीसीसीआयला सांगितलं. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी एमएस धोनीची निवड झाली नाही. धोनीच्या भविष्याबाबत निवड समितीने त्याच्याशी लवकरात लवकर बोलावं. सन्मानाने निवृत्त व्हायचा हक्क धोनीला आहे, असं मत अनिल कुंबळेने व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ऋषभ पंतने विकेट कीपर-बॅट्समन म्हणून चुणूक दाखवली आहे. त्यामुळे धोनीशी बोलणं गरजेचं आहे. २०२० साली टी-२० वर्ल्ड कप खेळवला जाईल. टीमसाठी निवड समितीने रणनितीची चर्चा करावी. जर धोनी टी-२० वर्ल्ड कपच्या टीममध्ये बसत असेल, तर त्याला प्रत्येक मॅच खेळवणं गरजेचं आहे,' असं वक्तव्य कुंबळेने केलं.