IND vs SL Match Fixing : आशिया कपच्या (Asia Cup) फायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 116 मिनिटात कार्यक्रम केला. मोहम्मद सिराजच्या (Mohm Siraj) घातक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 10 गडी राखून जिंकला. त्याचबरोबर टीम इंडियाने 8 व्यांदा आशिया कपवर मोहर उमटवली. मात्र, आता आशिया कपची फायनल वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आशिया कपची फायनल फिक्स (Match Fixing) होती का? असा सवाल सामन्याच्या दुसऱ्या दिवसापासून विचारला जात होता. अशातच आता  आशिया कपची फायनलवरून (Asia Cup 2023 final) मोठा राडा झाल्याचं पहायला मिळत आहे. नेमकं प्रकरण काय आहे पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेच्या लाजिरवाण्या पराभवानंतर स्थानिक क्रिकेट चाहते आणि भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्त्यांनी हा सामना फिक्स असल्याचं म्हटलं आहे. या सामन्याच्या पोलिस तपासाची मागणी त्यांनी केली आहे. श्रीलंकेची नागरी हक्क संस्था म्हणजेच सिटीझन पॉवर अगेन्स्ट लाचखोरी करप्शन अँड वेस्टने पोलिस विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी त्यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढत भष्ट्राचाराच्या चौकशीची मागणी केली आहे.


श्रीलंकेचा संघ 15.2 षटकांत 50 धावांत ऑलआऊट झाला, ही विचार करण्यासारखी बाब असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कामंथा तुषारा यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी तात्काळ तपास करण्याची देखील मागणी केलीये. इकोनॉमिक टाईम्सने याबाबतची माहिती दिली आहे.


नेमकं काय म्हणाले कामंथा तुषारा ?


रविवारी झालेल्या या खेळाबद्दल आम्हाला संशय आहे आणि तत्काळ तपास हवा आहे. श्रीलंका क्रिकेट (SLC) अधिकारी आणि खेळाडूंच्या दूरध्वनी संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह सर्वसमावेशक तपास व्हायला हवा. क्रिकेट हा जुगाराचा खेळ बनला आहे, ज्यावर पैशाचं राज्य आहे. श्रीलंका क्रिकेट भ्रष्ट असून क्रीडामंत्र्यांनी त्याची चौकशी करावी. ही त्यांची जबाबदारी आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. 


आणखी वाचा - IND VS AUS : 'चहलला का घेतलं नाही? भांडणं झालं अन्...', हरभजन सिंग सिलेक्टर्सवर संतापला, म्हणतो...


दरम्यान, कामंथा तुषारा यांनी फक्त आरोप केला आहे. त्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे त्यांचा आरोप फेटाळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पोलीस श्रीलंका क्रिकेट बोर्डावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार की नाही? यावर सध्या श्रीलंकेच चर्चा सुरू असल्याचं दिसतंय. श्रीलंकेचे खेळाडूंची मेहनत पाहता ते असा प्रकार करणार नाहीत, असा विश्वास काही श्रीलंकेच्या नागरिकांनी व्यक्त केलाय.