मुंबई : आयपीएल २०१८मध्ये पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बंगळुरु संघ आयपीएलचे विजेतेपद मिळवण्यापासून वंचित राहिलाय. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात बंगळूरुचा ३० धावांनी पराभव झाला आणि बंगळूरुने प्ले ऑफमधील जागा गमावली. आयपीएलच्या आतापर्यंतच्या एकाही हंगामात विराट कोहलीला आयपीएलचे जेतेपद मिळवता आलेले  नाहीये. आयपीएलदरम्या मीडियाशी बातचीत करताना विराटने आपल्या खाजगी जीवनातील अनेक गोष्टी उघड केल्या. अनुष्काबाबतच्या अनेक गोष्टी सांगितल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


गेल्या वर्षी ११ डिसेंबरला विराट आणि अनुष्का दोघेही विवाहबद्ध झाले. इटलीमध्ये या दोघांचा विवाह पार पडला. लग्नानंतर दोघांनी ट्विट करुन ही माहिती दिली. विराट कोहली आणि अनुष्का दोघेही सपोर्टिव्ह आहेत. लग्नाआधी अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना एकत्र पाहिले गेलेय. विराट आपल्या प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये म्हणतो की अनुष्का प्रेम आणि सन्मानाची हकदार आहे. 


सोशल मीडियामध्ये विराट कोहलीचा एक इंटरव्ह्यू व्हायरल होतोय. या व्हिडीओत विराट म्हणतोय, अनुष्का शर्मा घराची कॅप्टन आहे. ती नेहमी योग्य निर्णय घेते. ती माझी ताकद आहे. ती नेहमी मला पॉझिटिव्हिटी देते. तुम्हाला तुमच्या लाईफ पार्टनरकडून हेच तर हवे असते. मला अनुष्कासारखी पार्टनर मिळाली यासाठी मी आभारी आहे.