मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. वामिकामुळे देखील अनुष्का चर्चेत आहेच पण सध्या ती एका वेगळ्या कारणासाठी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या बालपणीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये तिची शाळेची मैत्रिणी ही आता प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन दिग्गज क्रिकेटपटूंच्या पत्नी या शाळेच्या चक्क मैत्रिणी आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी या शाळेपासूनच्या मैत्रिणी आहेत. 





अनुष्काचे वडील भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर होते तेव्हा त्यांचं पोस्टींग आसाममध्ये झालं होतं. आसाममध्ये सेंट मेरी स्कूलमध्ये अनुष्काचं शिक्षण झालं. त्यावेळी शाळेत तिची मैत्री साक्षीसोबत झाली. दोघींची गट्ट मैत्री जमली.


2013मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुष्का शर्मानं याबाबत खुलासा केला होता. 'साक्षी आणि मी एका छोट्याशा गावात राहात होतो. तिथे आमची ओळख झाली. आम्ही एकाच शाळेत शिक्षणासाठी जात होतो.' अनुष्का शर्मा आणि साक्षी धोनीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.