कँडी : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूडची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. विराटला भेटण्यासाठी अनुष्का श्रीलंकेतील कँडीमध्ये पोहोचली. सध्या टीम इंडिया तेथे वनडे सिरीजची तयारी करते आहे. 


मंगळवारी झालेल्या या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये विराट आणि अनुष्का एकत्र दिसत आहेत. सोबत टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री आणि काही श्रीलंकेचे फॅन्स देखील दिसत आहेत.