Anushka Sharma Sledges Virat Kohli: इंडियन प्रमिअर लिग 2023 (IPL 2023) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळेच फॅफ ड्युप्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघ साखळी फेरीमध्येच स्पर्धेबाहेर पडला. माजी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) फलंदाजीची मात्र तुफान चर्चा या आयपीएलदरम्यान झाली. ड्युप्लेसीस आणि कोहली या दोघांची कामगिरीच संघासाठी या स्पर्धेतील सकारात्मक बाब आहे असंही अनेक टिकाकारांनी म्हटलं. कोहलीने तर सलग दोन सामन्यांमध्ये शतकं झळकावली. याच आयपीएलमध्ये त्याने 7 हजार धावांचा टप्पा ओलांडला आणि असं करणारा तो पहिला खेळाडू ठरला.


विराटचा अभिनय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाचं आयपीएल कोहलीच्या चाहत्यांसाठी अगदी ट्रीट असल्याप्रमाणे ठरलं. आयपीएलमध्ये कोहलीने 237 सामन्यांमध्ये एकूण 7263 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने त्याला फॉर्म परत गवसल्याचं आणि आपल्या पत्नीला म्हणजेच अनुष्का शर्माला देतो. तसे हे दोघे अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावल्याचं दिसून येतं. नुकतेच त्यांनी एका स्पोर्ट्स ब्रॅण्डच्या इव्हेंटला हजेरी लावली होती. या ठिकाणी एका हलक्यापुलक्या चर्चासत्रात दोघेही सहभागी झाले होते. यावेळेस अनुष्काने विराट कोहली मैदानामध्ये कसा वागतो याची नक्कलही करुन दाखवली. विराट स्लेजिंग कसा करतो, विरोधकांची विकेट पडल्यानंतर विराट कसं सेलिब्रेशन करतो हे सुद्धा अनुष्काने दाखवलं. अनुष्काने हा अभिनय केल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हसू पिकलं.



टोलवाटोलवी...


विराट फलंदाजी करत असताना विकेटकिपर त्याची कशी स्लेजिंग करतो हे अनुष्का शर्माने दाखवलं. अनुष्काने विराट फलंदाजीची नक्कल करताना, "कम ऑन कम ऑन विराट, आज 24 एप्रिल आहे. आज तरी चांगला खेळ आणि रन बनव," असा टोमणा मारते. हा टोमणा मारल्यानंतर ती लगेच विराटला मिठी मारते. आता विराटने उत्तर देताना कामा नये असा अनुष्काचा एकंदरित रोख होता. मात्र विराटनेही जशास तसं उत्तर देताना, "तुमच्या संघाने एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये मिळून जेवढे रन केले नसतील तेवढे माझे एकूण सामने आहेत. समजलं का?" असं विराट म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 



"गोलंदाज सेलिब्रेट करत नाही एवढं सेलिब्रेशन..."


त्यानंतर विराट एखादी विकेट कशी साजरी करतो हे दाखवाना अनुष्काने बेभान होऊन पळतानाचा अभिनय केला. धावपळ, हवेत मारलेले पंच असा विराटची एकंदरित देहबोली असते असं अनुष्काने अभिनयासहीत दाखवलं. त्यानंतर अनुष्काने, "कधीतरी गोलंदाज सेलिब्रेट करत नाही एवढं सेलिब्रेशन विराट करतो," असं म्हणताच एकच हशा पिकला. विराटनेही, "त्या क्षणी हे घडून जातं. नंतर हे असलं दाखवत नका जाऊ मला फार लाज वाटते याची," अशी प्रतिक्रिया हसत हसत नोंदवली.



दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी विराट इंग्लडमध्ये दाखल झाला आहे. त्याने सरावही सुरु केला आहे. ऑस्ट्रेलियावरुद्ध हा सामना लंडनमधील ओव्हलच्या मैदानात 7 जून रोजी खेळवला जाणार आहे.