नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सध्या अनुष्का शर्मासोबतच्या नव्या संसाराच्या इनिंगमध्ये व्यस्त आहे. अशात टीम इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळालेला कर्णधार रोहित शर्माने करिअरचं तिसरं दुहेरी शतक लगावलं. रोहितने विराट-अनुष्का या नव दांम्पत्याला एक मोलाचा सल्लाही दिलाय. 


काय म्हणाला रोहित?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी श्रीलंका विरूद्ध मोहालीमध्ये २०८ रन्सची खेळी करून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेल्या रोहितने ट्विट करून विराट आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या. त्याने लिहिले की, ‘तुम्हा दोघांना शुभेच्छा! विराट कोहली मी तुझ्यासोबत हज्बंड हॅंडबुक शेअर करणार! अनुष्का शर्मा, तुझं आडनाव कायम ठेवशील’.



विराट-अनुष्का हनीमूनला...


विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबरला इटलीमध्ये लग्न केलं. मीडिया रिपोर्टनुसार, विराट आणि अनुष्का सध्या हनीमूनला गेले आहेत. विराटने अजून तरी रोहितच्या ट्विटवर रिप्लाय दिला नाही. पण अनुष्काने दोन दिवसांपूर्वी रोहितला रिप्लाय दिला. 


अनुष्काने काय दिला रिप्लाय?



अनुष्का म्हणाली की, ‘हाहाहा शुक्रिया रोहित! आणि शानदार खेळीसाठी तुला शुभेच्छा!.


रोहितच्या दुहेरी शतकाच्या मदतीने टीम इंडियाने मोहाली वनडे सामन्यात ३९२/४ असा स्कोर उभा केला. टीम इंडियाने हा सामना १४१ रन्सने जिंकला. आता तीन वनडे सामन्यांची सीरिज १-१ ने बरोबरीत आली आहे. आता सीरिजचा तिसरा सामना रविवारी विशाखापट्टणममध्ये खेळला जाणार आहे.