मुंबई : इंडियन प्रीमियर लीगमधील ११ व्या सीजनमध्ये विराट कोहलीची टीम बगळुरुला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. विराट कोहलीने नॉटआउट 68 रन केले. विराटने एक शानदार कॅच देखील घेतला. पण तरी देखील बंगळुरुला कोलकात्याने पराभूत केलं. पण या सामन्यात चर्चेचा विषय ठरला तो विराटचा कॅच आणि त्यादरम्यान अनुष्काने दिलेली रिअॅक्शन... याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.


मॅचमध्ये जेव्हा बंगळुरुचा पराभव निश्चित मानला जात होता तेव्हा विराटने एक असा कॅच पकडला जो व्हायरल होत आहे. मोहम्मद सिराजच्या बॉलिंगवर विराटने कर्णधार दिनेश कार्तिकचा शानदार कॅच पकडला. या सीजनमधील बेस्ट कॅचच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. 10 बॉलमध्ये 23 रन करत दिनेश कार्तिक आऊट झाला.