प्रेयसीचे चुंबन घेतल्यामुळे `हा` खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी
अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू वेगळ्याच अडचणीत अडकला आहे.
मुंबई : अमेरिकेचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा धावपटू वेगळ्याच अडचणीत अडकला आहे.
याचं मुख्य कारण आहे त्याची गर्लफ्रेंड. हा खेळाडू आहे आहे धावपटू गील रॉबर्ट्स उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, न्यायालयाने यासंदर्भात गील रॉबर्टसने दिलेले काहीसे विचित्र स्पष्टीकरण मान्य करत त्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.
अमेरिकेतील वर्ल्ड क्लास धावपट्टू आपल्या गर्लफ्रेंडने किस केल्यामुळे चांगलाच अडचणीत आला आहे. गिल रोबर्ट्स ओक्लाहोमामध्ये राहणारा असून 2016 मध्ये समर ऑल्मिपिकमध्ये अमेरिकेला गोल्ड मेडल जिंकून दिले होते.
झालं असं की...
गिल रोबर्टची गर्लफ्रेंड काही दिवसांपासून आजारी आहे. जेव्हा गिलला ड्रेग टेस्टमध्ये दोषी ठरवण्यात आलं तेव्हा आपल्या बचावासाठी त्याने नामी शक्कल लढवली. आपल्या गर्लफ्रेंडने जबरदस्त चुंबन केल्यामुळे गर्लफ्रेंडच्या औषधांचा असर त्याच्या शरिरावर झाला. आणि त्यामुळे आपल्या शरिरात ड्रग्स सापडले.
गील रॉबर्टसने २०१६ च्या समर ऑलिम्पिकमध्ये रिले शर्यतीती सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या उत्तेजक चाचणीत तो दोषी आढळला होता. त्यामुळे २०२० साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यास त्याला बंदी घालण्यात होती. या निर्णयाविरोधात गील न्यायालयात गेला. यावेळी त्याने आपल्या रक्तात उत्तेजक घटक कसे आले, याबद्दल स्पष्टीकरण दिले. गिलची प्रेयसी अॅलेक्स सलजार हिला सायनसचा त्रास असून तिच्यावर गेल्या काही दिवसांपासून औषधोपचार सुरू आहेत. माझ्या गेल्या शर्यतीच्यावेळीही ती सायनसवर औषधं घेत होती. त्यावेळी मी तिचे दीर्घ चुंबन घेतले होते. चुंबन घेताना आमच्या जिभेचा स्पर्श एकमेकांना झाल्यामुळे औषधाचा काही अंश माझ्या शरीरात गेला. त्यामुळेच उत्तेजक चाचणीत मी दोषी आढळलो, असा युक्तिवाद गीलने न्यायालयात केला होता.