Hand Of God Ball Auction: आजपासून 36 वर्षांपूर्वी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) कधीही न घडलेली एक घटना घडली होती. ही घटना फूटबॉल खेळाच्या इतिहासात कायमची कोरली गेली. फूटबॉल खेळाडूने चक्क हाताने गोल करून सामना जिंकला होता. हा खेळाडू होता अर्जेंटिनाचा (Argentina) महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना (Diego Maradona). फिफा विश्वचषक स्पर्धेत 22 जून 1986 ला अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला होता. यात मॅराडोना यांनी चक्क हाताने गोल केला होता. हा गोल 'हँड ऑफ गॉड' नावाने ओळखला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोल ठरला होता वादग्रस्त
या सामन्यात ट्यूनिशियाचे अली बिन नासिर हे रेफ्री होते. त्या सामन्याची आठवण काढण्याचं कारण म्हणजे मॅराडोना यांनी हाताने गोल केलेला त्या बॉलचा रेफ्री अली बिन नासिर यांनी लिलाव करण्याचा ठरवलं आहे. हा बॉल नासिर यांना करोडपती बनवू शकतो. 36 वर्षांपूर्वीचा हा बॉल लिलावात ठेवण्यात आला असून लिलावकर्ते ग्राहम बड यांनी या ऐतिहासिक बॉलला 27 लाख ते 33 लाख डॉलरपर्यंत किंमत मिळू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.


या बॉलचा लिलाव कतारमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी म्हणजे 16 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. या सामन्यात मॅराडोना यांनी वापरलेल्या इतर साहित्यांचाही लिलाव करण्यात आला आहे. मॅराडोना यांनी सामन्यात जे टीशर्ट घातलं होतं, ते टी-शर्ट 93 लाख डॉलरला विकलं गेलं होतं.


फिफा विश्वचषक स्पर्धेतील मोठी चूक
अर्जेंटिना आणि इंग्लंडदरम्यानचा हा उपांत्यपूर्व सामना होता. या सामन्यात हेडरने गोल करण्यासाठी मॅराडोना यांनी हेवत उडी मारली. पण डोक्याऐवजी त्यांनी हाथाने गोल केला. रेफ्री बिन नासिर यांनीही हा गोल असल्याचं मान्य केलं. इंग्लंडच्या खेळाडूंनी याला जोरदार विरोध केला. पण नासिर यांनी आपला निर्णय बदलला नाही. यानंतर फूटबॉलच्या इतिहासात हा गोल हँड ऑफ गॉड नावाने ओळखला जाऊ लागला. त्या सामन्याची आठवण म्हणून अलि बिन नासिर यांनी हा बॉल आपल्याकडे ठेवला होता. आता या बॉलचा लिलाव करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.


मॅराडोना यांचं निधन
2020 मध्ये मॅराडोना यांचं वयाच्या 60 व्या वर्षी निधन झालं. 21 वर्षांच्या कारकिर्दीत मॅरडोना यांच्यासाठी 1986 हे वर्ष ऐतिहासिक ठरलं. याच वर्षी मॅरडोना यांनी अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकवून दिला होता.