Fifa World Cup 2022 Semi Finals Between Argentina Vs Croatia: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या थरात आता अंतिम टप्प्यात आला आहे. अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. या चार संघापैकी वर्ल्डकपवर कोण नाव कोरणार याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. मात्र असताना उपांत्य फेरीत मेस्सी खेळणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात रंगलेला सामना 2-2 ने बरोबरीत सुटला. त्यानंतर पेनाल्टी शूटआउटमध्ये 3-4 ने अर्जेंटिंना बाजी मारली. मात्र या सामन्यात अर्जेंटिना शिस्तभंग केल्याचा आरोप फिफाने केला आहे. एकाच सामन्यात पाच पिवळी कार्ड मिळाल्यानंतर फिफाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्याने यासोबत क्रीडाप्रेमींच्या भावना जुळलेल्या आहेत. पण अर्जेंटिना संघावर कारवाई झाल्यास कर्णधार लियोनल मेस्सीवर बॅन लागू शकतो. त्यामुळे उपांत्य फेरीत खेळण्याच्या मेस्सीच्या आशा संपुष्टात येतील. मेस्सी एक स्टार फुटबॉलपटू असून संपूर्ण संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. मेस्सीचा हा पाचवा फूटबॉल वर्ल्डकप असून कारकिर्दीतील शेवटचा वर्ल्डकप असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षांपासून त्याचं स्वप्न अर्धवट राहू शकतं. मेस्सीने वर्ल्डकप स्पर्धेतील आतापर्यंतच्या सामन्यात एकूण 4 गोल मारले आहेत. 


बातमी वाचा- FIFA WC 2022: भारतानं FIFA वर्ल्डकपमध्ये खेळण्यासाठी काय करावं? कसा होणार स्पर्धेसाठी क्वालिफाय


पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाने पराभूत केल्यानं अर्जेंटिना संघावर टिकेची झोड उठली होती. मात्र त्यानंतर जोरदार कमबॅक केलं. उपांत्य फेरीत अर्जेंटिनाचा सामना क्रोएशियासोबत होणार आहे. दुसरीकडे, क्रोएशियाने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ब्राझीलचा पेनल्टी शूटआउटमध्ये पराभव केला. त्यामुळे क्रोएशियाला दुबळा संघ समजून चालणार नाही.