Arjun Tendulkar : लाईव्ह सामन्यात अर्जुनकडून ईशानला शिवीगाळ? व्हिडीओ होतोय व्हायरल
सोशल मीडियावर अर्जुनला ट्रोल (Arjun Tendulkar troll) देखील करण्यात आलंय. अशातच आता अर्जुनचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे.
Arjun Tendulkar : मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) शनिवारी पंजाब किंग्सकडून (Punjab Kings) पराभवाचा सामना करावा लागाला. या सामन्यात 13 रन्सने पंजाबने मुंबईचा त्यांच्याच घरात पराभव केला आहे. दरम्यान या पराभवाला अनेक जण अर्जुनला (Arjun Tendulkar) जबाबदार मानतायत. सोळाव्या ओव्हरमध्ये अर्जुनने 31 रन्स खर्च केले. परिणामी पंजाबचो स्कोर 200 पार गेला आणि मुंबईच्या फलंदाजांना तो गाठणं शक्य झालं नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर अर्जुनला ट्रोल (Arjun Tendulkar troll) देखील करण्यात आलंय. अशातच आता अर्जुनचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे.
शनिवारच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी 15 व्या ओव्हरपर्यंत पंजाबच्या फलंदाजांना चांगलं रोखून धरण्यात मुंबईला यश आलं होतं. मात्र अशातच 16 व्या ओव्हरमध्ये अर्जुन गोलंदाजीला आला आणि त्याने या ओव्हरमध्ये 31 रन्स दिले. अखेर 20 ओव्हर्समध्ये पंजाबने 214 रन्स केले.
अर्जुनने सिनियर खेळाडूला केली शिवीगाळ?
एककीडे गोलंदाजीमध्ये खूप महागडा ठरलेला अर्जुन मैदानावर शिवीगाळ करताना कॅमेरात कैद झाला आहे. झालं असं की, गोलंदाजी करत असताना अर्जुन फिल्डींग सेट करत होता. त्यावेळी इशान किशनला ते एका जागी उभं राहण्यास सांगत होता. मात्र इशानला ते समजलं नाही. यावेळी हताश होऊन अर्जुनने ईशानला अपशब्द वापरल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. (झी 24 तासने या व्हिडीओची पुष्टी केलेली नाही.)
गोलंदाजीमध्ये फार महागडा ठरला अर्जुन
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने त्याच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली. यावेळी त्याने होमग्राऊंडवर पहिली विकेट देखील घेतली. मात्र 16व्या ओव्हरमध्ये सॅम करन आणि हरप्रीत सिंग भाटिया यांना गोलंदाजी करताना त्याने एकूण 31 रन्स दिले. अर्जुनने पंजाबविरूद्ध एकूण 3 ओव्हर्समध्ये 1 विकेट घेत एकूण 48 रन्स दिले.
सर्वात महागडी ओव्हर
या महागड्या ओव्हरमुळे अर्जुन तेंडुलकरच्या नावे एक वाईट रेकॉर्ड नोंदवला गेलाय. आयपीएलमध्ये मुंबईसाठी दुसरा सर्वात महागडी ओव्हर फेकणारा गोलंदाज बनलाय. या यादीत पहिल्या स्थानावर डॅनियल सायम्स आहे. डॅनियलने गेल्या सिझनमध्ये कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 35 रन्स दिलेले. त्यानंतर आता अर्जुन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.