Arjun Tendulkar : रविवारी मुंबई इंडियन्स (Mumbai indians) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (MI vs RR) यांच्यात सामना रंगला होता. मात्र सामना सुरु होण्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ला मोठा धक्का बसला. हा धक्का म्हणजे राजस्थानविरूद्धच्या सामन्यामध्ये अर्जुन तेंडुलकरचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. अर्जुनच्या जागी युवा वेगवान गोलंदाज अरशद खान (Arshad Khan) ला टीममध्ये संधी देण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्जुनला प्लेईंग 11 मधून वगळल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. तर दुसरीकडे या सामन्यामध्ये अरशद खानने उत्तम कामगिरी केली. अरशदने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे मुंबईच्या आगामी सामन्यांमध्ये अर्जुन तेंडुलकरच्या जागी अरशदला संधी दिली जाऊ शकते. म्हणजेच आता अर्जुनला मुंबई इंडियन्सच्या टीममधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. 


अरशदने केलं संधीचं सोनं


वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरला बाहेर बसवण्याचा निर्णय घेतला. तर अरशदला टीममध्ये संधी दिली. दरम्यान अरशदनेही या संधीचं सोनं करत 3 विकेट्स काढले. अरशदच्या या उत्तम खेळामुळे अर्जुन तेंडुलकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. 


अरशदने पटकावली 14 कोटींची विकेट


राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनच्या स्वरूपात अरशदने त्याची पहिली विकेट काढली. राजस्थान रॉयल्सच्या टीमने संजूला 14 कोटींनी रिटेन केलं होतं. त्यामुळे मुंबईसाठी अरशदने 14 कोटींची विकेट घेतली. याशिवाय रविवारच्या सामन्यात तुफान फलंदाजी केलेल्या यशस्वी जयस्वालची विकेट देखील अरशदनेच काढली. या सामन्यात अरशदने हेटमायरला देखील स्वस्तात माघारी धाडलं. 


अरशद की अर्जुन?


गेल्या 3 वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर डेब्यूची प्रतिक्षा करत होता. अखेर यंदाच्या आयपीएल सिझनमध्ये त्याला डेब्यू करण्याची संधी मिळाली. अर्जुनने आतापर्यंत 4 सामन्यामध्ये 3 विकेट्स काढल्या आहेत. यावेळी त्याची इकोनॉमी 9.36 अशी होती.


तर दुसरीकडे अरशद खानने देखील आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांमध्ये त्याला 4 विकेट्स काढण्यात यश आलं आहे. याशिवाय त्याने राजस्थानविरूद्धच्या सामन्यात चांगली गोलंदाजी करत चाहत्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे आता पुढील सामन्यांमध्ये अर्जुनला बाकावर बसवलं जाऊ शकतं.