Arjun Tendulkar: टीममध्ये स्थान न मिळाल्याने अर्जुन बनला अंपायर?; 4-6 बाबत स्वतःच दिला निर्णय
सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला 30 लाखांच्या किमतीला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला संधी देण्यात आली नाहीये. गेल्या 2 सामन्यांमध्ये अर्जुनचा सब्स्टिट्यूट म्हणून समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला या 2 सामन्यांमध्येही संधी मिळाली नाही.
Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांसाठी कालचा दिवस फार आनंदाचा होता. मुंबईने यंदाच्या सिझनमध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवला. दरम्यान टॉसनंतर सर्वांच्या नजरा होत्या त्या प्लेईंग 11 वर. कारण सब्स्टिट्यूट खेळाडूंच्या लिस्टमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरचं (Arjun Tendulkar) नाव होतं. मात्र दिल्लीविरूद्धच्या सामन्यातंही त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. पण तरीही अर्जुन तेंडुलकराच्या एका कृत्याची चांगलीच चर्चा होताना दिसतेय.
सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला 30 लाखांच्या किमतीला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं आहे. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्याला संधी देण्यात आली नाहीये. गेल्या 2 सामन्यांमध्ये अर्जुनचा सब्स्टिट्यूट म्हणून समावेश करण्यात आला होता, मात्र त्याला या 2 सामन्यांमध्येही संधी मिळाली नाही.
अर्जुनचा व्हिडीओ होतोय व्हायरल
11 रोजी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यातंही अर्जुनला स्थान मिळालं नाही. मात्र यामध्ये अर्जुनचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये अर्जुन तिलक वर्माच्या शॉटवर अंपायर बनलेला दिसतोय.
झालं असं की, मुंबईची फलंदाजी सुरु असताना फलंदाज तिलक वर्माने एक मोठा शॉट खेळला. हा शॉट सिक्स होता की फोर हे पहाताच क्षणी समजलं नाही. मात्र यावेळी डग आऊटमध्ये बसलेल्या अर्जुनने थेट दोन्ही हात वर करून सिक्स असल्याचा इशारा केला. याचा फोटो आणि व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान हा सिक्स असल्याचं नंतर लक्षात आलं.
कधी होणार अर्जुनचा डेब्यू?
गेल्या 2 वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग आहे. मात्र आतापर्यंत अर्जुनला एकदाही प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र यंदाच्या सिझनमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि मार्क बाऊचर यांनी संकेत दिले होते.
त्यावेळी मार्क बाऊचर म्हणालेले की, मला असं वाटतं तो, यंदा मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट असून शकतो. त्यामुळे आता अर्जुनला टीममध्ये कधी संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.