मुंबई : आयपीएलचा यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी जणू एक वाईट स्वप्न आहे. मुंबईचे आतापर्यंत 8 सामने खेळले असून एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. 8 पराभव स्विकारल्यानंतर मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजेही बंदी झाले आहेत. तर आता अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या टीममध्ये कधी संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान मुंबई इंडियन्स आगामी 9 व्या सामन्यासाठी टीममध्ये बदल करण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने स्वतः याचे संकेत दिले आहेत. 


मुंबईच्या फ्रेंचायझीने सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा एक व्हिडीयो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीयोमध्ये अर्जुन गोलंदाजीची प्रॅक्टिस करताना दिसतोय. या व्हिडीयोच्या कॅप्शनमध्ये मुंबई इंडियन्सने लिहिलं आहे की, परफेक्ट फॉलो थ्रू अॅक्शन सोबत, अर्जुन तेंडुलकर लय भारी!



सोशल मीडियावरील या व्हिडीयोनंतर चाहत्यांनी अर्जुन तेंडुलकर पुढच्या सामन्यात डेब्यू करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्यावर्षापासून 22 वर्षीय अर्जुन तेंडुलकर डेब्यूसाठी प्रतिक्षेत आहे.


अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये मुंबई टीमने 30 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. विशेष म्हणजे IPL 2021 मध्ये अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता चाहत्यांच्या मागणीनंतर कर्णधार रोहित शर्मा अर्जुनचा टीममध्ये समावेश करण्याची शक्यता आहे.