Arjun Tendulkar Speaks after Centrury : रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) मास्टर ब्लास्टर  सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरने (Arjun Tendulkar) धमाकेदार शतक करत क्रिकेट जगताला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. राजस्थाविरुद्धच्या सामन्यात गोव्याकडून (Rajasthan vs Goa) खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने 179 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डेब्यू सामन्यात शतक ठोकल्यानंतर अर्जुनने एक मोठं वक्तव्य केलंय. अर्जुनच्या म्हणण्यानुसार, त्याला नेहमीच त्याच्या क्षमतेवर विश्वास होता. 


माझ्या क्षमतेवर नेहमीच माझा विश्वास


गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी निवडली. 23 वर्षीय अर्जुन तेंडुलकरचा येथे प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला होता. संधीचं सोनं करत त्याने राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात स्फोटक फलंदाजी करत शतक ठोकलं. यावेळी एका वेबसाईटशी बोलताना त्याने मोठं विधान केलं आहे.


अर्जुन तेंडुलकर म्हणाला, मला नेहमीच माझ्या क्षमतेवर विश्वास होता. मला माहिती होतं, एकदा का मी इथे टिकून राहिलो, तर मोठी खेळी नक्की खेळणार. मला केवळ पहिला एक तास खेळ सांभाळायचा होता आणि त्यानंतर माझ्या खेळीला पुढे न्यायचं होतं.


23 वर्षीय अर्जुन तेंडुलकर पुढे म्हणाला की, मी ज्यावेळी फलंदाजीसाठी मैदानात उतरलो, त्यावेळी माझं काम होतं की, मी जास्त बॅाल खेळू, कराण त्यावेळी सुयश 80 रन्सवर खेळत होता. त्याला सांभाळणं माझं काम होतं. तर दुसऱ्या दिवशी माझं काम होतं की, पहिल्या एका तासाचा खेळ सांभाळू आणि त्यानंतर रन्स करायला सुरुवात करू." 


साराची भावासाठी भावनिक पोस्ट


अर्जुन तेंडुलकरने शतक केल्यानंतर बहिण सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. 34 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचं तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सचिन तेंडुलकरने 1988 मध्ये आपला पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. आपल्या पहिल्या सामन्यात सचिनने नाबाद 100 धावांची खेळी केली होती. आता 34 वर्षांनंतर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अर्जुन तेंडुलकरनेही 120 धावांची खेळी केली. 


साराने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने म्हटलंय, 'तुझ्या मेहनतीचं फळ हळूहळू तुला मिळत आहे, ही तर फक्त सुरुवात आहे, तुझी बहिण असल्याचा मला अभिमान आहे'