Arjun Tendulkar : वानखेडेच्या मैदानावर आज मुंबई इंडियन्स (mumbai indians) विरूद्ध कोलकाता नाईट राडर्स (kolkata knight riders) यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र आजच्या सामन्यात अखेर अर्जुन तेंडुलकरला संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सकडून आज अर्जुन डेब्यू करणार असून चाहत्यांची इच्छा अखेर आज पूर्ण होणार आहे. आजच्या मॅचमध्ये अर्जुनचा खेळ पाहण्यासाठी चाहतेही प्रचंड उत्सुक आहेत.


2 वर्षांची प्रतिक्षा संपली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 2 वर्षांपासून अर्जुन मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहे. मात्र त्याला संधी देण्यात आली नव्हती. मात्र अखेरीस आजच्या सामन्यात त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आलाय. इतकंच नाही तर पहिली ओव्हर देखील अर्जुनला देण्यात आली. अर्जुनने पहिल्या ओव्हरमध्ये 5 रन्स दिलेत.


सूर्यकुमार यादव सांभाळतोय टीमची धुरा


आजच्या सामन्यात प्लेईंग 11 मधून रोहित शर्मा बाहेर असल्यने टीमच्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. सूर्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.


रोहित शर्मा प्लेईंग 11 मधून बाहेर


आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा टीममध्ये खेळणार नाहीये. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीवेळी रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरण्याची शक्यता आहे. 


दोन्ही टीमची प्लेईंग 11


कोलकाता नाइट रायडर्स 


रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती.


मुंबई इंडियन्स


इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टीम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पीयूष चावला, ड्वेन यान्सेन, रिले मेरेडिथ.