Arjun Tendulkar Playing 11 Prediction : मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहते आज मुंबई विरूद्ध बंगळूरू (Royal Challengers Bangalore) या सामन्याची आतुरतेने वाट पाहतायत. मात्र यावेळी दोन्ही टीमला चिंता सतावतेय ती, खेळाडूंना झालेल्या दुखापतीची. दोन्ही टीममधील अनेक खेळाडू दुखापतग्रस्त असल्याने अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. अशामध्येच आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी मिळणार का, हे पहावं लागणार आहे.


अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) करणार डेब्यू?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोच मार्क बाऊचर यांची पत्रकार परिषद झाली होती. यामध्ये कोच बाऊचर यांनी, अर्जुनला खेळायची संधी मिळू शकते, असे संकेत दिले होते. त्यामुळे पहिल्या सामन्यात अर्जुनला संधी मिळणार का हे पहावं लागणार आहे. 


मुंबईमध्ये कोण करणार ओपनिंग?


मुंबईमध्ये कर्णधार रोहित शर्मासोबत इशान किशन ओपनिंगला उतरण्याची शक्यता आहे. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना टीममध्ये संधी देण्यात येईल. यासोबत कॅमेरून ग्रीन आणि टीम डेविड यांचा ऑलराऊंडर म्हणून टीममध्ये समावेश केला जाऊ शकतो. तर गोलंदाजांमध्ये जोफ्रा आर्चर, जेसन बेहरनड्रॉफ तसंच रमनदीप सिंह यांना प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात येईल. 


मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग 11


इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमेरून ग्रीन, टीम डेविड, ऋतिक शौकीन, रमनदीप सिंह, डोफ्रा आर्चर, जेसन बेहरनड्रॉफ आणि कुमार कार्तिकेय


पत्रकार परिषदेत अर्जुनविषयी बोलताना रोहित म्हणाला होता, गेल्या काही दिवसांमध्ये अर्जुन तेंडुलकरने चांगला खेळ केला. मात्र त्याला दुखापत झाली होती. तर कोच मार्क बाऊचर यांनी सांगितलेलं की, अर्जुनने चांगला करत असून तो गोलंदाजी चांगली करतोय. यंदा मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट असून शकतो, असं मला वाटतंय.


अर्जुनला एकदाही संधी नाही


गेल्या 2 वर्षांपासून सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सच्या टीमचा भाग आहे. गेल्या वर्षी 30 लाखांना मुंबईच्या टीमने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र आतापर्यंत अर्जुनला एकदाही प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.