Arjun Tendulkar : अर्जुनने `या` एका चुकीमुळे केलं स्वतःच करियर बर्बाद? कधी मिळणार संधी
Arjun Tendulkar : यंदाच्या सिझनमध्ये अर्जुनला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. अर्जुनने आतापर्यंत आयपीएलमधील 4 सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये 3 विकेट्स काढलेत. दरम्यान अर्जुनला त्याची एक चूक फार महागात पडली आहे.
Arjun Tendulkar : मंगळवारी वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians ) आणि रॉयल चॅलेंजर बंगळूरू ( Royal Challengers Bangalore ) यांच्यात सामना रंगला होता. मुंबई इंडियन्सने 6 विकेट्सने रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा पराभव केला. या सामन्यामध्ये दोन्ही टीम्सच्या फलंदाजांनी कामगिरी केली. एकंदरीत फलंदाजांना चांगलाच चोप बसला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) अर्जुन तेंडुलकरला ( Arjun Tendulkar ) संधी देईल अशी अपेक्षा होती. मात्र त्याला संधी देण्यात आली नाही.
जवळपास तब्बल 3 वर्षांनंतर अर्जुनला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. कोलकाता नाईड रायडर्सविरूद्धच्या सामन्यात अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. मुंबईने 4 सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी दिली, मात्र त्यानंतर अर्जुनला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
अर्जुनला टीममधून बाहेर काढण्याचा त्याचीच एक चूक कारणीभूत मानली जातेय. आयपीएलच्या करियरमध्ये अर्जुनने केलेली ही एक चूक त्याला चांगलीच भारी पडली आहे.
कोणती चूक अर्जुनला पडली महागात?
डेब्यू केलेल्या सामन्यात अर्जुनला विकेट काढणं शक्य झालं नाही. मात्र दुसऱ्या म्हणजेच सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात अर्जुनने त्याच्या आयपीएलच्या करियरमधील पहिली विकेट काढली. इतकंच नाही तर या सामन्यात त्याने किफायतशीर फलंदाजी देखील केली.
अर्जुनने आयपीएलमधील त्याचा तिसरा सामना पंजाब किंग्जविरूद्ध खेळाला. या सामन्याची सुरुवात अर्जुनने चांगली केली. मात्र स्वतःच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये अर्जुनने चूक केली. अर्जुनने त्याच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 31 रन्स खर्च केले. पंजाबविरूद्धच्या सामन्यात 3 ओव्हरमध्ये अर्जुनने 16 च्या इकोनॉमीने 48 रन्स दिले. या सामन्यात केलेली खराब फलंदाजी अर्जुनची मोठी चूक ठरली.
पंजाबविरूद्धचा हा सामना मुंबईची टीम 13 रन्सने हरली होती. तर दुसरीकडे अर्जुनचं नाव आयपीएलमध्ये सर्वात जास्त रन खर्च करणाऱ्या लिस्टमध्ये सहाव्या नंबरवर आहे. यानंतर अर्जुनला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आलं.
आयपीएलमध्ये अर्जुनची कामगिरी कशी आहे
अर्जुनने आतापर्यंत आयपीएलमधील 4 सामने खेळले आहेत. या 4 सामन्यांमध्ये त्याला 3 विकेट्स काढण्यात त्याला यश मिळालय. अर्जुनने गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात 9 बॉल्समध्ये अर्जुनने 13 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये एका सिक्सचाही समावेश होता.