Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) क्रिकेटचा देव मानलं जातं. याच कारण म्हणजे त्याची उत्कृष्ट फलंदाजी. सचिन ज्यावेळी फलंदाजी करायचा त्यावेळी समोरच्या गोलंदाजाला त्याची विकेट कशी काढायची असा प्रश्न पडायचा. कारण सचिन तेंडुलकरची विकेट (Sachin Tendulkar Wicket) काढणं म्हणजे कठीण काम. मात्र हेच कठीण काम पार पाडलंय ते सचिनच्या मुलाने म्हणजेच अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकंतच सचिनने अर्जुन (Arjun Tendulkar) आणि स्वतःबाबत एक मोठा खुलासा केला आहे. नुकतंच अर्जुनने आयपीएलमध्ये (IPL 2023) डेब्यू केलं. इतकंच नाही तर त्याने दुसऱ्या सामन्यात स्वतःच्या करियरमधील पहिली विकेट देखील पटकावली. या बाप-बेट्याची जोडी एकत्र खेळू शकली नाही. मात्र अर्जुनने सचिनची विकेट घेतल्याचं सचिनने म्हटलं आहे. यासंदर्भात सचिन तेंडुलकरच एक ट्विट सध्या व्हायरल होतंय. 


अर्जुनबाबत वडिलांनीच केला मोठा खुलासा


नुकंतट ट्विटरवरून अनेक बड्या लोकांची ब्लू टीक काढून घेण्यात आलीये. यामध्ये सचिन तेंडुलकरच्या नावापुढेही ब्लू टीक नव्हती. अशातच सचिनने #AskSachin अशी इंटरएक्विव्ह मोहीम सुरु केली होती. या मोहिमेमध्ये सचिनने अनेकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरं दिली. याचवेळी सचिनने अर्जुनबाबत हा खुलासा केला आहे.


#AskSachin या अंतर्गत एका चाहत्याने सचिनला विचारलं की, कधी अर्जुनने तुझी विकेट घेतली आहे का? या प्रश्नाच्या उत्तराने सर्वचजण हैराण झालेत.


सचिनच्या या प्रश्नाला उत्तर देताना सचिन म्हणाला की, होय...एकदा लॉर्डसच्या मैदानावर...मात्र अर्जुनला याची आठवण करून देऊ नका. याचाच अर्थ लॉर्ड्सच्या मैदानावर अर्जुनने सचिनची विकेट घेतली आहे. मात्र या गोष्टीची काहीच माहिती नाहीये की, अर्जुनने लॉर्ड्सवर सचिनला कशी पद्धतीने आऊट केलं होतं.



अर्जुन गाजवतोय आयपीएल


केकेआर विरूद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यामध्ये अर्जुनने आयपीएलमध्ये डेब्यू केलं. याशिवाय दुसरा म्हणजेच हैदराबादच्या सामन्यात त्याने त्याच्या आयपीएल करियरमधील पहिली विकेट देखील पटकावली. पंजाबविरूद्धच्या सामन्यात वानखेडेच्या मैदानावर अर्जुनने विकेट घेतली असून होमग्राऊंडवरील ही त्याची पहिली विकेट ठरलीये. तर एकूण आयपीएलमध्ये त्याने 2 विकेट्स काढल्यात आहेत.