...तर अर्जुन तेंडुलकरचा आज टीममध्ये समावेश करणार; MI कोचकडून मोठं अपडेट
ता अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या टीममध्ये कधी संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
मुंबई : आयपीएलचा यंदाचा सिझन मुंबई इंडियन्ससाठी जणू एक वाईट स्वप्न आहे. मुंबईचे आतापर्यंत 9 सामने खेळले असून एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. 8 पराभव स्विकारल्यानंतर मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजेही बंदी झाले आहेत. तर आता अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या टीममध्ये कधी संधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान यावर आता मुंबई इंडिनयन्सचे कोच महेला जयवर्धने यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महेला जयवर्धने यांच्या सांगण्यानुसार, टीसमाठी प्रत्येक खेळाडू पर्याय आहे. हे मॅचअपसंदर्भात आहे, आम्ही सामने कसे जिंकू शकतो.
जयवर्धने यांनी पुढे सांगितलं की, आम्ही आमचा पहिला विजय मिळवण्यात यशस्वी झालो, त्यामुळे तो आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी काही अजून विजयाची गरज आहे. टीममध्ये सर्वोत्तम व्यक्तींचा समावेश करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जर अर्जुन त्यापैकी असेल ज्यांचा आम्ही विचार करतोय तर त्याचाही समावेश होईल. परंतु हे सर्व आपल्याला हवे असलेल्या संयोजनावर अवलंबून आहे.
दरम्यान मुंबई इंडियन्स आगामी सामन्यासाठी टीममध्ये बदल करण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने स्वतः याचे संकेत दिले होते.
सोशल मीडियावरील या व्हिडीयोनंतर चाहत्यांनी अर्जुन तेंडुलकर पुढच्या सामन्यात डेब्यू करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्यावर्षापासून 22 वर्षीय अर्जुन तेंडुलकर डेब्यूसाठी प्रतिक्षेत आहे.
अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये मुंबई टीमने 30 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. विशेष म्हणजे IPL 2021 मध्ये अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे आता चाहत्यांच्या मागणीनंतर कर्णधार रोहित शर्मा अर्जुनचा टीममध्ये समावेश करण्याची शक्यता आहे.