Arjun Tendulkar : यंदाच्या आयपीएलमध्ये ( IPL 2023 ) सचिन तेंडुलकरचा ( Sachin Tendulkar ) मुलगा अर्जुन तेंडुलकरने ( Arjun Tendulkar ) 3 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर डेब्यू केलं. अर्जुनने मुंबईकडून गोलंदाजी करत चार सामन्यामध्ये 3 विकेट्स देखील काढल्या. मात्र मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians ) गेल्या 3 सामन्यांमध्ये अर्जुन तेंडुलकरचा ( Arjun Tendulkar ) प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. अशातच शनिवारी चेन्नईविरूद्ध झालेल्या सामन्यादरम्यान अर्जुनचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोनंतर अर्जुनबाबत अनेक तर्क लावले जातायत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 3 सामन्यांपासून अर्जुनला संधी न दिल्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतायत. शनिवारी चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सने पराभव केला. दरम्यान या सामन्यानंतर अर्जुन चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी बोलताना दिसला. यावेळी अर्जुन धोनीकडून टीप्स घेत असल्याचं चाहत्यांनी म्हटलंय. 


टीप्स घेण्यासाठी धोनीजवळ पोहोचला अर्जुन


चेन्नई विरूद्ध मुंबईच्या सामन्यात देखील अर्जुन तेंडुलकरला प्लेईंग 11 मध्ये संधी देण्यात आली नाही. खेळाडू कोणताही असो, त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नाही त्याची निराशा होती. असाच अर्जुन देखील सामन्यानंतर टीप्स घेण्यासाठी धोनीकडे पोहोचला होता. यावेळी त्या दोघांचाही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 



अर्जुनला प्लेईंग 11 मध्ये संधी का मिळेना?


कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने आयपीएल 2023 मध्ये डेब्यू केलं होतं. यंदाच्या सिझनमध्ये अर्जुनने 4 सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. अर्जुनने हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. मात्र परंतु पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यातील त्याची एक ओव्हर टीमसाठी फार महागडी ठरली. 


पंजाब किंग्जविरुद्धच्या एका ओव्हरमध्ये अर्जुन तेंडुलकरला फलंदाजांनी चांगलाच चोप दिला. या ओव्हरमध्ये अर्जुनने 31 रन्स खर्च केले. त्यानंतर अर्जुनची ही ओव्हर मुंबईच्या पराभवाचे कारण ठरल्याचं मानलं जातं. यानंतर एका सामन्यात संधी देऊन अर्जुनला टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. 


तब्बल 3 वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेतनंतर अर्जुनने आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये डेब्यू केलं होतं. अर्जुनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले असून 3 विकेट्स काढण्यात त्याला यश आलंय. त्याने आतापर्यंत 9.5 ओव्हर्सची गोलंदाजी केली असून 92 रन्स खर्च केलेत. याशिवाय अर्जुनने फलंदाजी केली असून, 9 बॉल्समध्ये 13 रन्सची खेळी केली आहे.