IPL 2022: मुंबईच्या टीममध्ये शेवटपर्यंत का केला नाही Arjun Tendulkar चा समावेश? समोर आलं कारण
गेल्या सिझनप्रमाणे यावेळीही अर्जुनला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही.
मुंबई : आयपीएल 2022 मध्ये अनेक नवनवीन चेहरे दिसले शिवाय यापैकी काही नवीन चेहऱ्यांनी जोरदार कामगिरी देखील केली. अनेक टीममध्ये नवीन खेळाडूंना संधी मिळाली. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी टीम मुंबई इंडियन्सने ही अनेक युवा खेळाडूंना टीममध्ये खेळण्याची संधी दिली आहे. मात्र यावेळी सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला संधी मिळाली नाही.
मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची अशी आशा होती की, अर्जुन तेंडुलकरला यंदाच्या आयपीएलमध्ये संधी मिळावी. मात्र गेल्या सिझनप्रमाणे यावेळीही अर्जुनला एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही.
सध्या सर्वांच्या मनात प्रश्न आहे की, यंदाच्या सिझनमध्ये खराब कामगिरीनंतर एकदाही अर्जुनला का संधी देण्यात आली नाही? अखेर याचं उत्तर टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने (Mohammad Kaif) दिलं आहे.
मोहम्मद कैफने त्याच्या एका इंटरव्यूमध्ये अर्जुन तेंडुलकरला अजून वाट का संधीची पाहावी लागते याबाबत वक्तव्य केलं आहे. यावेळी कैफच्या म्हणण्याप्रमाणे, अर्जुन अजून आयपीएलचे दडपण सहन करू शकणार नाही.
कैफ म्हणाला, “जर MI ला वाटत असतं की अर्जुन तेंडुलकर तयार आहे, तर त्यांनी त्याला आतापर्यंत त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश केला असता. मला वाटतं की, त्याला अजूनही त्याच्या खेळावर काम करण्याची गरज आहे. कैफ पुढे म्हणाला, एखाद्या खेळाडूला कर्णधार शेवटच्या सामन्यापर्यंत का थांबतो? जर तो चांगला असेल तर तो आधीच प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल."